श्रीरामपुर (प्रतिनिधी) - माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सोमवार दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७:३० वाजता अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव सोपानराव राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष योगेश विटनोर, अशोक कारखान्याचे संचालक प्रफुल्ल दांगट, काशिनाथ गोराणे, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ.सुनीता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत सोमवार दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तिरंगा झेंड्याचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांना संस्थेचे सचिव सोपानराव राऊत यांनी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ.सुनीता गायकवाड, प्रा.दिलीप खंडागळे, प्रा.शिवाजी पटारे, प्रा.विवेक साळवे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुयोग थोरात, प्रा.दिलीप साळुंके, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, कार्यालयीन अधीक्षक बाबासाहेब पटारे, योगेश डेंगळे, हरिभाऊ मतकर, अशोक चव्हाण तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.