त्रिदल सैनिक सेवा संघाच्या पाठपुराव्याला यश ;अमृत जवान महोत्सवाच्या माध्यमातून शिवार रस्त्याचे उद्घाटन - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

17 August 2022

त्रिदल सैनिक सेवा संघाच्या पाठपुराव्याला यश ;अमृत जवान महोत्सवाच्या माध्यमातून शिवार रस्त्याचे उद्घाटन


श्रीरामपूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील बेलापूर खुर्द या गावाच्या हद्दीतील माजी सैनिक विलास खर्डे यांच्या शेतामधील शिवार रस्ता गेल्या ७० वर्षापासूनचा नामशेष झालेला होता मा. जिल्हाधिकारी सो. यांच्या संकल्पनेतून अमृत जवान महोत्सव योजनेची सुरुवात झाली त्यानंतर या योजनेची दखल राज्य शासनाने घेतली, या योजने अंतर्गत श्रीरामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक माजी सैनिकांचे प्रश्न मार्गी लावण्यात आले, त्याचप्रकारे बेलापूर खुर्द येथील माजी सैनिक विलास खर्डे यांच्या शेतामधील सत्तर वर्षांपूर्वीचा जो शिवार रस्ता होता तो शिवार रस्ता अनेक खातेदारांनी अतिक्रमण करून बंद करून ठेवला होता त्यामध्ये ४० ते ४२ असे खातेदार होते, परंतु शेतामध्ये उत्पन्न निघाल्यानंतर त्याला घेऊन जाण्यासाठी रस्ताच नव्हता या योजनेअंतर्गत तहसीलदार साहेबांनी लक्ष घालून व त्रिदल सैनिक सेवा संघाने सतत पाठपुरावा करून अखेर हा रस्ता खुला करून दिला याचा लाभ ४० ते ४२ खातेदारांना या माजी सैनिकांमुळे व संबंधित खातेदारानी संमती दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे, शिवाय सर्वानुमते या रस्त्यास त्रिदल सैनिक चौक असे नामकरणही करण्यात आले आहे, भारत देशाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून या शिवार रस्त्याचे उपविभागीय (प्रांत) अधिकारी अनिल पवार,तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस, श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, कामगार तलाठी शिंदे ,त्रिदल सैनिक संघटनेचे अहमदनगर उत्तर उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार,तालुकाध्यक्ष संग्राम जीत यादव, सुनील कुलकर्णी, विलास खर्डे ,राम म्हैस, राम पुजारी, सुनील पंढरीनाथ पुजारी, गवळी ,सुनील भालेराव, संतोष देवराय,ऍड. दीपक बाराहाते, सुनील बाराहाते ,संपत पुजारी, मारुती पुजारी, ज्ञानदेव बाराहाते, भागीरथ हुरे ,पंकज खर्डे,मयूर खर्डे इत्यादी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर कृष्णा सरदार यांनी केले तर ऍड. दीपक बाराहाते यांनी आभार व्यक्त केले.
LightBlog

Pages