अशोक' च्या वृक्षरोपण अभियानाचा माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे हस्ते शुभारंभ - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

17 August 2022

अशोक' च्या वृक्षरोपण अभियानाचा माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे हस्ते शुभारंभ


श्रीरामपूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक सह.साखर कारखाना तसेच अशोक शैक्षणिक संकुलाच्या वतीने स्वातंञ्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित पाच हजार वृक्ष लावण्याच्या अभियानाचा स्वातंञ्यदिनी विविध ठिकाणी पाचशे झाडे लावुन शुभारंभ करण्यात आला.
     अशोक कारखाना तसेच अशोक शैक्षणिक संकुलाच्या वतीने स्वातंञ्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या पावसाळ्यात पाच हजार झाडे लावण्याचे अभियान राबविण्यात येणार आहे. सदर अभियानाचा कारखाना परिसर, अशोक पॉलिटेक्निक, अशोक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भास्करराव गलांडे पा. आय.टी.आय, अशोक आयडीअल व इंग्लिश मिडीयम स्कूल, भास्करराव गलांडे पा. विद्यालय, जि.प.प्राथमिक शाळा आदि ठिकाणी माजी आ.भानुदास मुरकुटे व मान्यवरांचे हस्ते पाचशे झाडे लावून शुभारंभ करण्यात आला.
     सदर प्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन भाऊसहेब उंडे, माजी चेअरमन सोपानराव राऊत, संचालिका सौ.मंजुश्री मुरकुटे, काशिनाथ गोराणे, माजी सभापती प्रा.सौ.सुनिताताई गायकवाड, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ, शहराध्यक्ष नाना पाटील, अशोक बँकेचे व्हा.चेअरमन ऍड.सुभाष चौधरी, संचालक चंद्रकांत काळे, कारखाना संचालक बाबासाहेब आदिक, पुंजाहरी शिंदे, विरेश गलांडे, योगेश विटनोर, प्रफुल्ल दांगट, ज्ञानेश्वर काळे, माजी संचालक राधाकृष्ण उंडे, शिक्षण संस्थेचे सहसचिव भास्कर खंडागळे, प्राचार्य अंजाबापू शिंदे, प्राचार्य रईस शेख, प्राचार्य संपतराव देसाई, डी.व्ही.झुराळे, मुख्यध्यापक निवृत्ती पठारे, मुख्यध्यापक महादेव गर्जे, कारखाना अधिकारी विक्रांत भागवत, विजय धुमाळ, कृष्णकांत सोनटक्के, बाळासाहेब जाधव, विजय धुमाळ, रमेश आढाव, अण्णासाहेब वाकडे, जालिंदर औताडे, अध्यापक व कर्मचारी सहभागी झाले होते.
LightBlog

Pages