श्रीरामपूर (प्रतिनिधी) देशाच्या स्वातंञ्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्या हुतात्म्यांचा आणि स्वातंञ्य लढ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलेल्यांचा विसर पडता कामा नये. भारत आता महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. बलशाली भारत हे स्वातंञ्यवीरांचे स्वप्न होते. त्या स्वप्नपूर्तीसाठी युवकांनी योगदान द्यावे, असे आवाहन अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक कारखाना कार्यस्थळावर अशोक कारखाना तसेच अशोक शैक्षणिक संकुलाच्या वतीने स्वातंञ्याचा अमृत महोत्सवी सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी श्री.मुरकुटे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त श्री.मुरकुटे यांनी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे, माजी चेअरमन कोंडीराम उंडे, सोपानराव राऊत, संचालिका सौ.मंजुश्री मुरकुटे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ, शहराध्यक्ष नाना पाटील, काशिनाथ गोरणे,माजी सभापती सौ.सुनिताताई गायकवाड, अशोक बँकेचे व्हा.चेअरमन अँड.सुभाष चौधरी, संचालक चंद्रकांत काळे, कारखाना संचालक बाबासाहेब आदिक, पुंजाहरी शिंदे, विरेश गलांडे, योगेश विटनोर, प्रफुल्ल दांगट, ज्ञानेश्वर काळे, शिक्षण संस्थेचे सहसचिव भास्कर खंडागळे, कामगार संचालक अशोक पारखे आदि उपस्थित होते.
यावेळी कारखान्याचे सुरक्षा कर्मचारी, बँड पथक, अशोक महाविद्यालय, भास्करराव गलांडे पा. विद्यालय, जि.प.प्राथमिक शाळेचे विद्यार्थ्यांनी सुरक्षा अधिकारी बाळासाहेब राऊत यांचे नेतृत्वाखाली शिस्तबध्द संचलन करुन मानवंदना दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अप्रतिम सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थीतांची दाद मिळविली.
मुख्य सोहळ्यापूर्वी अशोक पॉलिटेक्निक येथे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, अशोक महाविद्यालय व जि.प.प्राथमिक शाळेत शिक्षण संस्थेचे सचिव सोपानराव राऊत, अशोक आयडीअल व अशोक इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये संचालक विरेश गलांडे, भास्करराव पा.गलांडे आय.टी.आय येथे संचालक बाबासाहेब आदिक, अशोक माध्यमिक हायस्कूल येथे व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास प्राचार्य अंजाबापू शिंदे, उपप्राचार्य सौ.सुनिताताई गायकवाड, प्राचार्य रईस शेख, प्राचार्य संपतराव देसाई, आय.टी.आय चे डी.व्ही.झुराळे, हायस्कुलचे मुख्याध्यापक निवृत्ती पठारे, प्राथमिक शाळेचे मुख्यध्यापक महादेव गर्जे, कारखाना अधिकारी विक्रांत भागवत, लव शिंदे, प्रमोद बिडकर, कृष्णकांत सोनटक्के, बाळासाहेब जाधव, विजय धुमाळ, रमेश आढाव, अण्णासाहेब वाकडे, जालिंदर औताडे आदिंसह कर्मचारी, अध्यापक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.