भोकर (वार्ताहर) - श्रीरामपूर तालुक्यातील भोकर ग्रामपंचायत कार्यालय येथे राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी नुकतीच साजरी करण्यात आली.
भोकर ग्रामपंचायत कार्यालय येथे राजमाता, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर याचे पुण्यतिथी निमीत्ताने मान्यवरांनी त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. या वेळी ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे, सोसायटीचे उपाध्यक्ष गणेश छल्लारे, सोसायटीचे माजी अध्यक्ष सागर शिंदे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष भाऊराव सुडके, सचीन शेळके,नितीन मते, सोमनाथ डूकरे, सोमनाथ पंडीत व सुनिल पांढरे आदिंसह मान्यवर उपस्थीत होते.
फोटो क्यापशन -
भोकर ग्रामपंचायत कार्यालय येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन प्रसंगी प्रदिप ढुमणे, गणेश छल्लारे, सागर शिंदे, भाऊराव सुडके, सचीन शेळके, नितीन मते, सोमनाथ डूकरे आदिंसह मान्यवर दिसत आहेत.(छाया-सोमनाथ पंडीत)