भोकर (वार्ताहर) - श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमीत्ताने आयोजीत ‘हर घर तिरंगा’ अभियानास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथे जिल्हा परीषद शाळा, माध्यमिक विद्यालया बरोबरच वस्ती शाळा, आगंणवाडीसेविका, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे सेविका, आशांकुर महिला केंद्र यांचेसह सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय व सर्वसामान्य कुटूंबांनी दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहन करत उस्पुर्त प्रतिसाद दिला.
या दरम्यान भोकर ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा घेत जनजागृती केली, त्यात ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रय आहेर, ग्रामविकास अधकिारी प्रदिप ढुमणे, महेश पटारे, गणेश छल्लारे व सतीष शेळके यांनी विशेष परीश्रम घेत नागरीकांत जनजागृती घडवून आणली. त्याचबरोबर जिल्हा परीषद प्राथमिक शाळेने व श्री जगदंबा प्रासादिक विद्यालयाने या जनजागृती अभियानात सहभागी होत विद्यार्थी व विद्यार्थीनींची प्रभात फेरी काढली.
या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी हातात राष्ट्रध्वज, विविध प्रकारचे सुचना फलक घेवून ‘भारत मातेचा विजय असो, जय हिंद, जय जवान, जय कीसान, भारतीय स्वातंत्र्याचा विजय असो’ आदि प्रकारच्या घोषणा देत जनजागृती केली, ग्रामपंचायतीने जिल्हा परीषद शाळा, माध्यमिक शाळा, वाड्यावस्त्यांवरील शाळा, आगंणवाडी सेविका व आशांच्या माध्यमातून सुमारे सातशेच्या दरम्यान राष्ट्रध्वज पुरविले. अनेक नागरीकांनी स्वयंस्पुर्तीने मिळेल तेथून राष्ट्रध्वज उपलब्ध करून आपल्या व्यावसायाच्या ठिकाणी, घरांवर व कार्यालयांवर राष्ट्रध्वज फडकावत देशाप्रति आदर व प्रेम व्यक्त करत ‘हर घर तिरंगा’ अभियांनात सहभाग नोंदविला.
तर येथील श्री जगदंबा विद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यात देशभक्तीपर गित गायनस्पर्धेत यशराज जोशी, मंजूश्री काळे,वत्कृत्वस्पर्धेत सुप्रिया चौधरी, श्वेता मते, गायत्री शिंदे, राखी बनविण्याच्या स्पर्धेत रचना विधाटे,दिव्या खंडागळे, रोहिणी आबुज, रांगोळी स्पर्धेत अंजली विधाटे व तनुष्का पटारे, चित्रकला स्पर्धेत श्वेता मते, अंजली विधाटे व स्नेहा काळे आदिंनी उत्कृष्ट कामगीरी बजावत पारीतोषीक पटकाविले. याकामी विद्यालयाचे मुख्याध्यापक राधाकीसन क्षेत्रे, दत्तात्रय मैड, अविनाश महाजन, राहुल डावरे आदिंसह शिक्षकांनी विशेष परीश्रम घेतले.
जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक मल्हारी ठोकळ व जगन्नाथ विश्वास यांचे मार्गदर्शनाखाली इयत्ता पहीली ते चौथीच्या चिमुकल्यांनीही हातात राष्ट्रध्वज घेत गावातील प्रमुख प्रदिक्षीणा मार्गावरून विविध प्रकारच्या घोषणा देत जनजागृती अभियानात सहभाग नोंदविला. त्याच बरोबर या शाळेने ही रांगोळीस्पर्धा सोबत वत्कृत्व स्पर्धा भरविल्या यात अनेक बालकांनी सहभाग नोंदवत आनंदोत्सव साजरा केला.
सलग तिन दिवस गावात सर्वत्र राष्ट्रध्वज फडकत होते, अनेक ठिकाणी देशभक्तीपर गीत वादन सुरू होते, एंकदरीत देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत सर्वांनीच ‘हर घर तिरंगा’ अभियानास उस्पुर्त प्रतिसाद दिला.
फोटो क्यापशन.
भोकर येथे जिल्हा परीषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाअतर्गत जनजागृती अभियानातून काढलेली प्रभात फेरी दिसत आहे.(छाया- चंद्रकांत झुरंगे, भोकर)