इथली भांडवलदारी विषमतावादी व्यवस्था घाव घालून बदलायची असेल तर मतदान हेच हत्यार वापरावे लागेल : प्रा.किसन चव्हाण - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

17 August 2022

इथली भांडवलदारी विषमतावादी व्यवस्था घाव घालून बदलायची असेल तर मतदान हेच हत्यार वापरावे लागेल : प्रा.किसन चव्हाण


शेवगाव (प्रतिनिधी) मंगळवार दि १६/८/२०२२ रोजी मौजे मुंगी ता. शेवगांव येथे थोर समाज सुधारक,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती मुंगी ग्रामस्थांच्या वतीनेमोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, या प्रसंगी वंचित बहूजन आघाड़ीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थितीत होते,यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले,लोकशाहीबाबत अण्णाभाऊ साठे म्हणाले होते जग बदल घालुनी घाव,सांगून गेले मज भीमराव, म्हणजे इथली भांडवलदारी, विषमतावादी, व्यवस्था मुळासकट बदलायची असेल तर लोकशाही देशामध्ये मतदान हेच प्रभावी हत्यार आहे, त्यानेच व्यवस्था बदलू शकते म्हणून आपल्या मतदानाचा वापर चांगली समाजाची तळमळ असणारी माणसं निवडून दिली पाहिजे म्हणजे ते सत्तेचा वापर सर्वसामान्य गोरगरीब घटकांसाठी करतील,आज सत्तेचा उपयोग हा केवळ स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठीच केला जातोय आणि त्याला जबाबदार आपणच आहोत,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंगीचे सरपंच दादासाहेब भुसारी हे होते, उपसरपंच भैय्यासाहेब दसपुते, छावा संघटनेचे स्वप्नील राजेंभोसले, वंचितचे तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, दिगंबर बल्लाळ,संचालक जनार्धन घोरपड़े,विनोद सरोदे, पत्रकार रावसाहेब निकाळजे, निलेश ढाकणे,शाहमदभाई तांबोळी, संभाजी घोरपड़े , लक्ष्मण मोरे,शहादेव गरड, सारंगधर चव्हाण,दादा इथापे, गंगाधर पांडव,अरुण पहीलवान, अशोक पानखेडे,जनार्धन हुगे,
 दत्तात्रेय टाकसाळ,कचरु सरोदे व इतर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, प्रथम बॅंन्ड पथकासह,फटाके तौफा वाजवून भव्य मिरवणुक काढून मुंगी येथील चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली, यावेळी विनोद सरोदे, नितीन घोरपडे, रंगनाथ मांतग आदि उपस्थित होते.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती सर्व समाज बाधंवांनी एकत्र येत साजरी करून एक चागंला संदेश दिला आहे, या कार्यक्रमाचे सुत्र संचालन सतिष वाल्हेकर यांनी केले तर सरपंच दादासाहेब भुसारी यांनी सर्व उपस्थितीतांचे आभार व्यक्त केले.
LightBlog

Pages