श्रीरामपूर (प्रतिनिधी) : येथील कचेरी रोडवरील बॅ.रामराव आदिक यांच्या पुतळ्यासमोर इम्तियाज खान व जफर कुरेशी यांच्या न्यू किसान मोटर्स अंँड ऑटो कन्सल्टंट व गुडलक ऑटो कन्सल्टंट या दुकानाचे उद्घाटन दिनांक १५ ऑगस्ट रोजी देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कुराण पठणाने व बेंगलोर येथील पिरसाहेब सय्यद रियाजुद्दीन चिस्ती यांच्या शुभहस्ते रिबन कापून करण्यात आले. यावेळी अमजद बाबा, बरकत अली शेख, राजेखान,जनाब, सलीम दस्तगीर, शफिक शहा, जाकीर भाई शाह,जफर कुरेशी, इम्तियाज खान, शेख फकीर मोहम्मद, इम्रान खान, सादिक अली शेख, अन्वर भाई, यांच्यासमवेत अनेक मान्यवर उपस्थित होते, या उद्घाटनानंतर शहरातील अनेक प्रतिष्ठिता़ंनी या दुकानास भेट देऊन भरभरून शुभेच्छा दिल्या.