समता फाऊंडेशनचे कार्य खरोखरच उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणणारे ; शिवाजीराव साळवे - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

20 August 2022

समता फाऊंडेशनचे कार्य खरोखरच उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणणारे ; शिवाजीराव साळवे


श्रीरामपूर (प्रतिनिधी) : चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांनी येथील समता कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूटला सदिच्छा भेट दिली असता समता फाऊंडेशनचे अध्यक्ष शौकतभाई शेख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी समता कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूटचे इंजि. मोहसिन शौकत शेख,चर्मकार संघर्ष समितीचे जिल्हा संघटक दिलीपराव शेंडे (सर), जिल्हा उपाध्यक्ष नामदेव कानडे, श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष प्रेमचंद वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी समता फाऊंडेशन द्वारा चालविले जाणारे विविध सामाजाभिमुख उपक्रमाची माहिती इंजि.मोहसिन शेख यांनी श्री.साळवे यांना दिली.
यावेळी बोलताना श्री.साळवे म्हणाले की, सामाजिक कार्यकर्ते शौकतभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली समता फाऊंडेशन संचलित समता कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूटमध्ये समाजातील उपेक्षित आणि दुर्लक्षित समाज घटकांतील मुला- मुली,महिलांना मोफत कॉम्प्यूटर कोर्सेस यासोबतच लघू व्यावसायिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समता फाऊंडेशनच्या विविध सामाजाभिमुख उपयुक्त शिबीरांद्वारे मोफत पॅनकार्ड, श्रमकार्ड, शॉप एक्ट, उद्यम आधार, साबिल रिपोर्ट, इन्कम टॅक्स रिटर्न, पॅनकार्ड लिंकिंग, व्हिजिटिंग कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, डिमेंट अकाऊंट, बैंकेचे झिरो बैलेन्स अकाऊंट आदी अशा अत्यंत गरजेच्या बाबी निःशुल्क आणि मोफतच देण्यात येत असल्याने निश्चितच उपेक्षित समाजघटकांना याचा मोठा फायदा मिळत असल्याचे, तथा सामाजातील उपेक्षित, दुर्लक्षित आणि गरजु घटकांना समजून घेत त्यांना महत्वाच्या कामी आवश्यक असलेले पॅनकार्ड, श्रमकार्ड अशा महत्वाच्या कामी विविध ठिकाणी विविध शिबीरे लावत त्याचे विनामुल्य (मोफत) वितरण करुन करीत असलेली निर्पेक्ष आणि निस्पृह समाजसेवा खरोखरच स्तूतीजन्य आणि उपेक्षित घटकांना न्याय देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणारी असल्याचे ते म्हणाले.
सोबतच भविष्यात समता फाऊंडेशन आणि चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विचारांनी व सहकार्याने गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात मार्गदर्शन, मदत करण्याविषयी सकारात्मक चर्चा करण्यात आली.तसेच समाजातील उपेक्षित, वंचित घटकांना, कुटूंबाना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
समता फाऊंडेशनच्या सामाजाभिमुख उपक्रमांना चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) या संघटनेचे नेहमी पाठबळ आहेच शिवाय समता फाऊंडेशन आणि चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने केवळ श्रीरामपूर शहर, तालुकाच नव्हेतर संपूर्ण जिल्हा आणि राज्यात लवकरच विविध सामाजाभिमुख उपक्रम राबविले जाणार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी समता फाऊंडेशनच्या विविध सामाजाभिमुख उपक्रमाद्वारे उपेक्षित घटकांना सामावून घेण्याचे निर्पेक्ष कार्य हाती घेतल्याबद्दल चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या हस्ते समता फाऊंडेशनचे अध्यक्ष शौकतभाई शेख यांचा सत्कार करण्यात आला,सर्व उपस्थितांचे इंजि.मोहसिन शेख यांनी आभार मानले.
यावेळी समता कॉम्प्यूटरचे सरताज शेख, सौ.सलवा एम. शेख, कु.पुजा सकट, जिशान सय्यद, सौ.सपना तांबे,रिहान शेख आदी उपस्थित होते.
LightBlog

Pages