चर्मकार संघर्ष समिती (महा. राज्य) आयोजित एकदिवसीय आदिवासी समाज अभ्यास दौरा - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

25 August 2022

चर्मकार संघर्ष समिती (महा. राज्य) आयोजित एकदिवसीय आदिवासी समाज अभ्यास दौरा


 

श्रीरामपूर (शौकतभाई शेख) :

 

 

चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) शाखा श्रीरामपूर यांच्यावतीने रविवार दि.२१/०८/२०२२ रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या श्रीरामपूर शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने अकोले



(जि.अहमदनगर) येथील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी समाज बांधवाच्या अडचणी, विविध समस्या,शैक्षणिक सुविधा व इतर समस्या या विषयावर माहितीसाठी एक दिवसीय अभ्यास दौरा आयोजित करत आदिवासी बांधवांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.

या दौऱ्याची सुरुवात येथील कांदा मार्केट येथून सामाजिक कार्यकर्ते तथा सर्व धर्मिय सेवाभावी संस्था असलेल्या समता फाऊंडेशन चे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख,  इंजि.मोहसिन शौकत शेख, सामाजिक कार्यकर्ते तथा मा. नगरसेवक बाबासाहेब गांगड, सोमनाथराव गांगड,यांच्या हस्ते पुजन करुन दौऱ्याच्या प्रवासासाठी सुरुवात करण्यात आली.यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी या स्तूतीजन्य सामाजिक उपक्रमास आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

श्रीरामपूर - चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) आयोजित एकदिवसीय आदिवासी समाज अभ्यास दौऱ्याची श्रीफळ वाढवून सुरुवात करताना समता फाऊंडेशनचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्या समवेत समितीचे पदाधिकारी,महिला भगीनी व इतर मान्यवर


तथा अकोले ( जि.अहमदनगर) तालुक्याच्या दुर्गम भागात जाऊन तेथे राहत असलेल्या आदीवासी समाज बांधवांचे जीवनमान, राहणीमान, शैक्षणिक समस्या, शेती,आरोग्य अशा अनेक विषयांवर पदाधिकाऱ्यांनी आदिवासी समाज बांधवांच्या भेटी घेतल्या. प्रत्यक्ष वस्तुस्थिती समजून घेऊन जीवनातील अडचणींवर मात करत समाज बांधव आपले जनजीवन कसा जगतो आहे.या सर्व गोष्टींचा विचार करून चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) शाखा श्रीरामपूरच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्याशी विचार विनिमय करून अभ्यास दौऱ्याचे नियोजन केलेले होते. यामुळे चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) ही संस्था सर्व समाजातील तळागाळातील उपेक्षित आणि दुर्लक्षित सर्व जाती - धर्मिय समाज बांधवांपर्यंत पोहचून कार्य करणारी संघटना आहे.आतापर्यंत  संघटनेमार्फत सर्व समाजातील, विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्य, दुर्घटनाग्रस्त बांधवांना मदत, समाजातील गरजवंताच्या सुखदुःखात, सहभाग, होणारे अन्याय,अत्याचार याविरोधात समाज बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून अनेक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असते. तसेच समिती मार्फत नेहमी अनेक सामाजाभिमुख उपक्रमही राबविण्यात येत असतात,यावेळी देखील उपेक्षित आणि दुर्लक्षित असलेल्या आदिवासी समाज बांधवांच्या गरजू शालेय विद्यार्थी मुला - मुलींना,(रविवारी शाळेला सुट्टी असल्याने) अकोले तालुक्यातील देवगांव शाळेचे संतोष मोरे (सर) यांच्याकडे अकोले तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या विद्यार्थ्यां करिता शूजचे वाटप करण्यासाठी शुज सुपूर्द करण्यात आले. सोबतच प्रल्हाद कोंढार (सर) सुनिल मेसकर (सर),  भाऊराव तुपे (सर),राजेंद्र साबळे (सर), संतोष मोरे (सर) यांच्या मार्फत आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचेही वाटप करण्यासाठी शैक्षणिक साहित्य सुपूर्द करण्यात आले. आदिवासी बांधवांविषयी प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष सखोल माहिती घेऊन भविष्यामध्ये चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) मार्फत आदिवासी बांधवांच्या गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यामध्ये सहकार्य तसेच वेळोवेळी उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मदत कशी करता येईल असे नियोजनही करण्यात आले. उद्योजक बाळासाहेब वाळे, प्रल्हाद कोंढार (सर) तालुका अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, आदिवासी प्रा.शिक्षक संघटना अकोले, आदर्श शिक्षक संतोष मोरे (सर), सुनिलराव मेसकर (सर) तालुका अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना अकोले,भाऊराव तुपे (सर), राजेंद्र साबळे (सर), आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी समितीतील सर्व पदाधिकारी यांचे स्वागत करुन उत्तम अशी अल्पोपहाराची व्यवस्था देखील केली होती. सदरील उपक्रमात दिलीप कारभारी शेंडे (सर) - जिल्हा संघटक अहमदनगर जिल्हा, संजय दळवी, जिल्हाध्यक्ष - अहमदनगर जिल्हा, सौ. सुनंदा दिलीप शेंडे - महिला जिल्हाध्यक्ष अहमदनगर जिल्हा, सौ.इंदुताई नन्नवरे - शहराध्यक्ष श्रीरामपूर, नामदेवराव कानडे, अशोकराव खैरे (सर),प्रेमचंद वाघमारे आदींनी विशेष परिश्रम घेतले.



श्रीरामपूर - चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) शाखा श्रीरामपूर यांच्यावतीने अकोले येथील संतोष मोरे (सर), प्रल्हाद कोंढार (सर), सुनिल मेसकर (सर), भाऊराव तुपे (सर), राजेंद्र साबळे (सर) यांच्याकडे आदिवासी समाजातील गरजू विद्यार्थ्यांना वाटपासाठी शैक्षणिक साहित्य आणि शुज सुपूर्द करताना चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) शाखा श्रीरामपूर चे पदाधिकारी.


दिलीप शेंडे (सर) यांनी आपल्या मनोगतात आदिवासी समाज हा अत्यंत प्रतिकूल परिस्थिती जीवन जगतो. या समाजात शिक्षणाचा अभाव आहे. हा समाज खूप प्रामाणिक आणि मेहनती आहे, हा समाज पुढे नेण्यासाठी तथा त्याची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी जी गरज आहे.ती चर्मकार संघर्ष समिती आणि आपण सर्वांनी मिळून शैक्षणिक बाबींमध्ये व इतरही बाबींमध्ये शक्यतो होईल त्या प्रमाणात मदत करणे गरजेचे आहे असे सांगितले, 

जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौ.सुनंदा दिलीप शेंडे आणि संजय दळवी यांचा प्रल्हाद कोंढार (सर) तालुका अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य आदिवासी प्रा.शिक्षक संघटना अकोले, सुनिल मेहकर (सर) तालुका अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना अकोले. आदर्श शिक्षक संतोष मोरे (सर), आणि त्यांचे सर्व शिक्षक सहकारी यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.


अकोले - चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) शाखा श्रीरामपूर पदाधिकाऱ्यांकडून गरजु आदीवासी विद्यार्थ्यांकरीता प्राप्त करण्यात आलेले शुज जि.प.प्रा.शाळा देवगांव ता.अकोले येथील आदिवासी बांधवांच्या गरजू मुलांना वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक रुखा काळू मुठे (सर), शिक्षक संतोष मोरे (सर), शिक्षिका मिना खाडे मॅडम,अंगणवाडी सेविका गवारे ताई, मदतनीस भांगरेताई आदी.


यावेळी प्रल्हाद कोंढार (सर),संतोष मोरे (सर), सुनील मस्कर (सर) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) ही संस्था उपेक्षित सामाजातील दुर्लक्षित समाज बांधवांसाठी जे सामाजाभिमुख आणि उपयुक्त उपक्रम राबवत आहेत त्या उपक्रमाचे कौतुक करावे तितके कमीच आहे,कारण ही एकमेव संघटना अशी आहे की,ती तळागाळातील उपेक्षित आणि दुर्लक्षित समाज बांधवापर्यंत पोहचून आपले कार्य करत आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्यासोबत भविष्यात उपेक्षित सामाज बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही उपेक्षित घटकांसाठीची चांगले ध्येय, धोरणे,शैक्षणिक सुविधा, अशी सामाजाभिमुख उपक्रम राबविण्यासाठी आम्ही बरोबरीने कायम संघटनेसोबत राहू अशी ग्वाही ही यावेळी दिली. 

चर्मकार संघर्ष समिती आदिवासी अभ्यास दौऱ्याकरीता सर्वश्री  नायब तहसीलदार अमोल एडके,  दिलीप शेंडे (सर), संजय दळवी,

प्रेमचंद वाघमारे,बाळासाहेब चव्हाण,नामदेव नन्नवरे,भरतराव क्षीरसागर, गोपीचंद एडके सर,

नामदेव कानडे,अशोकराव खैरे, सुभाषराव पोटे, सौ.वैशाली पोटे, सुहास दादा धनेधर सर.सौ.सुनंदा शेंडे.सौ. इंदुबाई नन्नवरे. सौ. सविता चव्हाण.किर्ती चव्हाण. सौ.संगीता क्षीरसागर.सौ.मोरे सौ.मनीषा कानडे.सौ.सुरेखा एडके.सौ.मोहिनी खैरे, कु.गायत्री खैरे.सौ.आशा दळवी,सौ. प्रियंका धनेधर, सौ. सोनल वाघमारे. कु. श्रावस्ती वाघमारे,चि.आदित्य एडके, चि.सुरज बनकर. चि. सिद्धार्थ शेंडे, कु.साक्षी वाघमारे,चि.आयुष धनेधर आणि पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.अशापप्रकारे चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) सातत्याने उपेक्षित आणि दुर्लक्षित समाज बांधवांकडे सातत्याने लक्ष ठेऊन असल्याने सामाजातील उपेक्षित सामाज बांधवांना मोठा आधार आणि पाठबळ प्राप्त होऊन मुख्य प्रवाहात येण्याचे त्यांचे मार्ग सुखकर होत असल्याचे यानिमित्ताने अघोरेखित होते.

LightBlog

Pages