*सदाभाऊंनी आपल्या मित्राला दाटलेल्या कंठाने व पाणावलेल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप दिला* - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

18 August 2022

*सदाभाऊंनी आपल्या मित्राला दाटलेल्या कंठाने व पाणावलेल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप दिला*


*मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारं वादळ अखेर शांत झालं..*

*मराठा ,ओ.बी.सी. आरक्षणासाठी मैदानात उतरू*

प्रशांत पाटील

चिखली- माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांना दाटलेल्या कंठाने व पानावलेल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप देत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणार वादळ शांत झाल्याचे म्हटले असून सदाभाऊंच्या नेतृत्वात शेतकरी चळवळीसह मराठा ,ओबीसी आरक्षणासाठी रयत क्रांती पक्षाच्या माध्यमातून मैदानात उतरू अशी प्रतिक्रिया रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत पाटील यांनी दिली आहे,
         दिनांक १४ ऑगस्ट २०२२ मराठा समाजाचे नेते विनायकराव मेटे यांचे अपघाती निधन झाल्याची बातमी सकाळी सकाळी समजली,
मेटे साहेबांनी मराठा समाजाचे नेतृत्व अनेक वर्षे केलं, तरुण वयामध्ये चळवळीच्या माध्यमातून राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केला होता, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका घेऊन महाराष्ट्र भर मराठा समाजामध्ये जनजागृतीचे काम त्यांनी केले, राजकारणाच्या पटलावरती मराठा समाजाचे अनेक प्रश्न त्यांनी मांडले, ६ वर्षे विधानपरिषदेमध्ये त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी सदभाऊंना मिळाली,सभागृहामध्ये ज्या ज्या वेळी मराठा समाजाचा प्रश्न आला त्यावेळी ते पोटतिडकीने बोलायला उभे राहत,
ग्रामीण भागातला मराठा समाज हा अल्पभूधारक झालेला आहे, भूमिहीन झालेला आहे, तो दऱ्याखोऱ्यात खेडोपाडी राहतो. त्याची उदरनिर्वाहाची साधन तोकडी आहेत अनेक मराठा समाजातील शेतकरी, शेतमजूर हे कर्ज बाजारी झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत, त्यांच्या लेकरबाळांना शैक्षणिक व नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मेटे साहेब लढत राहिले, भारतीय जनता पक्षा बरोबर घटक पक्ष म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), महादेव जानकर साहेबांचा राष्ट्रीय समाज पक्ष व रयत क्रांती संघटना २०१४ पासून ते आजपर्यंत काम करत असतांना घटक पक्ष हे एकत्रित ठेवण्याचे काम मेटे साहेबांनी केलं असून आज घटक पक्षातला आमचा सहकारी एक तारा निखळला असल्याचे सदाभाऊंनी म्हटले आहे
      
सदाभाऊंनी त्यांच्या आठवणीतला हृद प्रसंग सांगत असतांना २०१६ साली सदाभाऊ आमदार झाल्यानंतर त्यांच्या गावात गावकऱ्यांनी मोठी जंगी मिरवणूक घेतली होती,त्यासाठी मेटे साहेब मुंबईवरून सायंकाळी ८ वाजता आले आणि मिरवणूकीला सुरवात झाली, सदाभाऊंच्या गावातील लहान पोरांपासून ज्येष्ठ मंडळी पर्यंत सर्वजण मिरवणुकीत सहभागी झालेले होते,झांझपथक व धनगरी ढोलांचा आवाज गावात घुमत होता, गावातल्या माय माऊल्या रस्त्याच्या कडेला पंचारती घेऊन उभा राहिल्या होत्या, सगळा गाव गुलालात नाहून निघाला होता. गावातली तरुण पोरं मेटे साहेबांना खांद्यावरती घेऊन वाद्यांच्या निनादामध्ये बेभानपणे नाचत होते,तब्बल ३ तासांपेक्षा अधिक वेळ मेटे साहेब तरुणांच्या खांद्यावर होते, मिरवणुकीच्या समारोपाचे भाषण करत असताना मेटे साहेबांच्या डोळ्यात अश्रू आले, "एखादं गाव आपल्या लेकरावरती भरभरून प्रेम करत" हे पाहिल्यानंतर सदाभाऊ सारखा शेतकरी नेता हा कुटुंबाचा नाही तर संपूर्ण गावाचा आहे, हे आज ह्या गावात ह्या ठिकाणी त्यांच्या गावातील जनतेच्या कृतीतून मला पाहायला मिळालं." तुम्ही वाढवलेलं हे नेतृत्व हे मरळनाथपूर गावाचं राहिलं नाही, तर ते आत्ता महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचं झालं आहे हे त्यांनी गावाला आवर्जून सांगितलं. दोन दिवसांनी सदाभाऊ मुंबईमध्ये गेल्यानंतर गावातील सर्व जनतेचं व तरुणांचं त्यांनी तोंड भरून कौतुक केलं व भाऊंच्या गावातील ग्रामदैवत मरळनाथाच्या मंदिरासाठी आमदार फंडातून हॉल बांधायला निधीचं पत्र त्यांनी सदाभाऊंच्या हातामध्ये दिलं,ज्या मरळनाथाच्या आशिर्वादाने तुमच्यासारखं नेतृत्व ह्या महाराष्ट्राला मिळालं, त्या मरळनाथपूर पुण्य भूमीतील मरळनाथाला आपल्याकडून जे अर्पण करता येत आहे ते मी करत आहे .आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असणारं असं लाखात एक असं नेतृत्व होतं आमचं मेटे साहेब होते असे सदाभाऊ यांनी म्हटले आहे,
 साहेब तुम्ही इतक्या लवकर जाल हे आजही मनाला पटत नाही,ह्या दुःखातून शिवसंग्राम परिवाराला व त्यांच्या कुटुंबाला सावरण्याची शक्ती परमेश्वर देवो अशी प्रार्थना मराठा समाजासाठी लढणाऱ्या लढवय्याला सदाभाऊ खोत यांनी अतिशय जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबरच मराठा व ओ बि सी आरक्षणासाठी सदाभाऊंनी पुढे यावे अशी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी मागणी केली असून सदाभाऊंच्या नेतृत्वात लवकरच मराठा, ओबीसी आरक्षणासाठी मैदानात उतरू असे रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत पाटील यांनी सांगितले आहे.
LightBlog

Pages