श्रीरामपूर (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता सामुहिक राष्ट्रगीताचे आवाहन केले होते. त्यानुसार अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यस्थळावर सामुहिक राष्ट्रगीत संपन्न झाले.
अशोक साखर कारखाना कार्यस्थळावर बुधवारी (ता.१७) सामुहिक राष्ट्रगीत सादर करण्यात आले. याप्रसंगी व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे, कामगार संचालक गिताराम खरात, अशोक पारखे, कार्यकारी संचालक संतोष देवकर, चिफ इंजिनिअर बाळासाहेब उंडे, चिफ केमिस्ट भगवान निकम, मॅनेजर अॅग्री नारायण चौधरी, पर्सोनेल मॅनेजर लव शिंदे, कार्यालय अधीक्षक विक्रांत भागवत, चीफ अकौंटंट मिलींद कुलकर्णी, डिस्टीलरी इनचार्ज बाळासाहेब हापसे, डेप्युटी चीफ इंजिनिअर सुनिल चोळके, मॅनेजर परचेस भगीरथ काळे, मॅनेजर एच.आर. प्रमोद बिडगर, मॅनेजर इ.डी.पी. विजय आंबिलवादे, सिव्हिल इंजिनिअर कृष्णकांत सोनटक्के, गोडाऊन किपर अनिल कोकणे, मेडिकल ऑफिसर डॉ.मंगेश उंडे, सुरक्षा अधिकारी बाळासाहेब राऊत, लेबर ऑफिसर अण्णासाहेब वाकडे, उप शेतकी अधिकारी प्रदीप शिंदे, डे.चिफ केन डेव्हलपमेंट ऑफिसर विजयकुमार धुमाळ, प्रॉपर्टी सुपरवायझर व अशोक कामगार पतपेढीचे चेअरमन भाऊसाहेब दोंड, गॅरेज इनचार्ज रमेश आढाव, सॅनिटेशन इन्स्पेक्टर विलास लबडे, कारेगाव भाग कंपनीचे मॅनेजर ज्ञानेश्वर बडाख यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.