हिंदू एकता आंदोलन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण कदम यांच्या "नारायणास्त्र"आत्मचरित्र प्रकाशन सोहळा सांगलीत मोठ्या दिमाखात संपन्न - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

17 August 2022

हिंदू एकता आंदोलन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण कदम यांच्या "नारायणास्त्र"आत्मचरित्र प्रकाशन सोहळा सांगलीत मोठ्या दिमाखात संपन्न


श्रीरामपूर (प्रतिनिधी) : सांगलीचे माजी आमदार व हिंदू एकता आंदोलन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायणराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन नुकतेच सांगलीत माजी मंत्री व संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे चेअरमन अण्णासाहेब डांगे व आमदार नितीन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, कराडचे माजी नगराध्यक्ष विनायक पावसकर, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, प्रदेशाध्यक्ष सुदर्शन (आण्णा) शितोळे, महाराष्ट्र भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामन गवळी, सांगली शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नवभारत शिक्षण मंडळाचे चेअरमन गौतम पाटील उपस्थित होते. 
या कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन नारायणराव कदम यांचे चिरंजीव बिपीनदादा कदम व कन्या जिल्हा न्यायाधीश अश्‍विनीताई लोखंडे यांनी केले, कार्यक्रमासाठी नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव, पुणे, मुंबई, सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर येथील हिंदू एकता आंदोलन पक्षाचे जिल्हाप्रमुख,पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
LightBlog

Pages