रणजित श्रीगौड
शौकतभाई शेख श्रीरामपूर :
गरजवंताचे व प्रवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणी नेत्यांशी संपर्क न ठेवता शासन प्रशासनाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधुन प्रश्न सोडवा.असे महाराष्ट्र प्रदेश प्रवाशी महासंघाचे राज्य अध्यक्ष रणजित श्रीगौड यांनी नाशिक येथील श्रीस्वामी समर्थ मंगल कार्यालयात ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याच्यावतीने दोन दिवसीय अभ्यासवर्गाचे आयोजन प्रंसगी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले.
नाशिक येथील श्रीस्वामी समर्थ मंगल कार्यालयात दि.२० ते २१ ऑगस्ट दरम्याण दोन दिवसीय अभ्यास वर्गाचे आयोजन ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले.
दि.२१ रोजी च्या द्वितिय सत्रात श्री.रणजित श्रीगौड यांनी आपल्या मनोगतात पुढे बोलताना सांगितले की,
पुरातन काळी पायी प्रवास होत असे,श्रावणबाळ याने आपल्या माता -पितांना तिर्थयात्रा करण्यासाठी पायी प्रवास केला. स्वामी विवेकानंद यांनी धर्म प्रचारार्थ जगभर प्रवास केला.ते महासधांचे प्रेरणास्थान व पुज्यनिय आहे.रथसप्तमीला सुर्यनारायणाचे डोळे उत्तरायणाकडे होते.हा दिवस जगाच्या कल्याणासाठी आहे. म्हणुन रथसप्तिमीला प्रवासी दिन साजरा केला जातो.महामंडळात विविध मार्गाने होणाऱ्या उधळपट्टी वर अंकुश लावण्यासाठी व होणारी पिळवणुकीवर आळा घालण्यासाठी प्रवासी महासंघाचा जन्म झाला.महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ ही ग्राहक पंचायत ची शाखा आहे.प्रवासी हा शेवटी ग्राहक आहे.प्रवासी महासंघाच्या राज्यातील प्रत्येक जिल्हा,तालूका स्तरावर शाखा कार्यरत आहे.ही चळवळ घटनात्मक आहे.ग्राहक पंचायत चे सर्व कार्य प्रवासी महासंघाला लागु आहे.ज्यांना प्रवासाची आवड आहे.व तन- मन-धनाने कार्य करण्याची इच्छा आहे.अशानां समावुन घेणे,तथा प्रवाशांचे न्याय हक्क आबाधित राहणेकामी सतर्क रहाणे हे या संघटनेचे कार्य आहे,आपल्याला पद मिळाले म्हणुन कोणीही गर्व करू नये व आपल्या पदाचा गैरवापर, दूरूपयोग करू नये, अडल्या - नडलेल्यांना सहकार्य करावे.निस्वार्थीपणे सेवा द्यावी. इतरानां समाऊन घ्यावे. व्यापारी. लायन्स कल्ब चे सदस्यांना समाऊन घेणे.पायी चालण्यापासुन ते विमानातून प्रवास करणारे हे प्रवाशी आहेत. अडल्यांच्या - नडल्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राजकारणी नेत्यांकडे न जाता शासनाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना योग्य न्याय देणे.वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मैत्रीपुर्ण सबंध ठेऊन कार्य करा.मैत्रीपुर्ण संबध ठेवल्याने प्रश्न त्वरित सुटतात. सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणावर करणे हे संघटकाचे कार्य आहे.
महाराष्ट्र प्रदेश प्रवाशी महासंघाच्या बैठकीमध्ये
रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकानां सवलत मिळावी व इतर सुविधा उपल्बध करून देण्यासाठी केंद्र सरकार व रेल्वे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल.तसेच जिल्हास्तरावरील समिती मध्ये जिल्हाध्यक्षानां पदे देणे यासोबत इतर ठरावही मांडण्यात आले, या ठरावांना मान्यता देण्यात आली. या बैठकीला इतर जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्ष व संघटक पदाधिकारी उपस्थित होते.