मोहसीनभाई शेख यांचा श्रीरामपूरात असाही अनोखा वाढदिवस साजरा ! - Dainik Samtadoot

Breaking

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

12 January 2025

मोहसीनभाई शेख यांचा श्रीरामपूरात असाही अनोखा वाढदिवस साजरा !

 

श्रीरामपूर / प्रतिनिधी:

येथील रॉयल चॅरिटेबल ट्रस्ट मागील सात वर्षांपासून दर रविवारी गोर - गरीब, उपेक्षित, दुर्लक्षीतांना जेवण आणी गरजु वस्तू वाटपाचे कार्य सातत्याने अविरतपणे करत आहे.

या रविवारी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा अल नुरानी ग्रुप चे अध्यक्ष मोहसीन शब्बीर शेख यांच्या वाढदिवसानिमित्ताने केक, फटाके,ढोल - ताशे,डीजे अशा सर्व बडेजावपणाला फाटा देत गोर - गरीब उपेक्षित आणी दुर्लक्षीत गरजुंना त्यांच्यातर्फे जेवण आणी कपड्यांचे वाटप करण्यात आले.



           येथील रॉयल चॅरिटेबल ट्रस्ट संचलित रॉयल रिश्ता. कॉम कार्यालयात गोर - गरीब उपेक्षित आणी दुर्लक्षित गरजुंना जेवण आणी कपड्यांचे वाटप करुन मोहसिनभाईंनी आपला वाढदिवस साजरा केला.


         याप्रसंगी समता फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख, अल नुरानी ग्रुप चे अध्यक्ष मोहसीन शब्बीर शेख, रॉयल चॅरिटेबल ट्रस्ट संचलित रॉयल रिश्ता.कॉम चे कलीमभाई शेख,मोहसीन ए मिल्लत कमेटीचे ॲड. मोहसिन शेख, उपाध्यक्ष मुश्ताकभाई शेख, शब्बीरभाई (राजुभाई) कुरैशी, फरजाना बाजी आदि  प्रामुख्याने उपस्थित होते.



             याप्रसंगी आपल्या शुभेच्छापर मनोगतात शौकतभाई शेख म्हणाले की, खरेतर सर्वांनी अशा या अनोख्या पद्धतीच्या वाढदिवसाचे अनुकरण केले पाहिजे तसेच आपलेही वाढदिवस साजरे करताना कोणत्याही प्रकारचे केक, फटाके, ढोल - ताशे,डीजे अशा सर्व बडेजावपणाला फाटा देत साध्या पद्धतीने आपले वाढदिवस साजरे करुन सामाजातील उपस्थित आणी दुर्लक्षतांच्या मुलभूत गरजा व समस्यांकडे खारीचा वाटा म्हणून लक्ष दिले गेल्यास त्यांना थोडासा आधार व दिलासा मिळू शकेल तथा यामुळे त्यांच्याकडून मिळणारे आशिर्वादरुपी जे काही असेल ते मोठे अनमोल असेल असेही ते म्हणाले. तथा मोहसिनभाईंच्या वाढदिवसाप्रित्यर्थ उपस्थित मान्यवरांनी मोहसीनभाईंना शुभेच्छाही व्यक्त केल्या.

    


         यावेळी तौफिक शेख, अन्जार शहा, इरफान शेख, रमजान पठाण,नईम शेख, बब्बू इनामदार, अश्फाक तांबोळी, चि.अरहम शेख, आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.मोहसिन शेख यांनी केले तर कलीमभाई शेख यांनी आभार मानले.

*वृत प्रसिद्ध सहयोग*

समता मीडिया सर्व्हिसेस 

 श्रीरामपूर - 9561174111

LightBlog

Pages