श्रीरामपुर / प्रतिनिधी:
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले तालुक्यातील वडाळा महादेव येथील भिमराज प्रतिष्ठाण तसेच सुहासभाऊ मित्र मंडळ यांचे वतीने विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ तालुक्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हितचिंतक मित्र मंडळ यामध्ये समन्वय बैठक संपन्न झाली यावेळी विविध विषयावर चर्चा करून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हेमंत ओगले यांना जाहिर पाठिंबा देण्यात आला तसेच त्यांना सर्वानुमते शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या भविष्यात आमच्या मागण्या तसेच समाज बांधव मित्रमंडळाच्या पाठिशी उभे राहावे आमदार शंभर टक्के होणार असा विश्वास या ठिकाणी जाहीर पणे व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑल ख्रिश्चन कौन्सिलचे प्रवीण राजे शिंदे, मुस्लिम आघाडीचे सलीमभाई शेख, राजुभाऊ गागुर्डे मित्रमंडळ, वंचित बहुजन आघाडी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व समाजातील प्रमुख व्यक्ती श्रीरामपूर विधानसभेत येणाऱ्या ३२ गावातील वेगवेगळ्या गावातून आलेली सर्वच समाज बांधव हितचिंतक माझ्यावर प्रेम करणारा असंख्य तळागाळातील फुले शाहू आंबेडकर विचारातील कार्यकर्ते उपस्थित होते. प्रसंगी अनेकांनी मनोगत व्यक्त केली, कार्यक्रमासाठी दीपक नवगिरे, प्रवीण साळवे, छायाताई दुशिंग, चैतन्य आल्हाट, माळेवाडी येथील मोहन बंधू, वडाळा महादेव येथील भीमराज प्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्याचबरोबर वस्ताद ग्रुपचे अध्यक्ष मंगेश शेलार, बाळासाहेब भोंडगे, लहुजी सेनेचे लहू खंडागळे,राजू शिंगाडे, कैलास खामकर, चंद्रकांत वाघमारे, योगेश म्हांकाळे, कृष्णा म्हांकाळे, सागर जाधव, वार्ड नं. २ येथील मुस्लिम समाज बांधव मित्रपरिवार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे सुजित राठोड यांनी आभार मानले.
वृत्त विशेष सहयोग
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
संकलन
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - ९५६११७४१११