आंबीखालसा गावचे निसर्गप्रेम आदर्शवत : प्रमोद मोरे - Dainik Samtadoot

Breaking

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

24 October 2024

आंबीखालसा गावचे निसर्गप्रेम आदर्शवत : प्रमोद मोरे


 

सह्याद्रीच्या कुशीतील आंबीखालसा येथे निसर्गप्रेमींचा स्नेहमेळावा संपन्न


श्रीरामपूर / प्रतिनिधी:

वाढते तापमान आणि पर्यावरणाचा असमतोल लक्षात घेता वृक्षांची कमी झालेली संख्या वाढविणे गरजेचे असून आंबीखालसा निसर्गप्रेमींनी नक्षत्रवन निर्माण करून निसर्ग वाचविण्याचे आदर्शवत काम केले आहे, असे प्रतिपादन निसर्ग व पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी व्यक्त केले.

संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा येथे निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गावांमध्ये नुकतेच निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाच्यावतीने स्नेहमेळावा आणि वनसहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुरुवातीला वृक्षमित्र स्व. आबासाहेब मोरे व स्व. सुभाष मोरे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्षा छायाताई राजपूत ह्या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राज्यसंघटक डॉ. शरद दुधाट यांनी केले. यावेळी निसर्ग व पर्यावरण मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सरपंच बाळासाहेब ढोले, जालिंदर आहेर, संजय गायकवाड, प्रकाश केदारी, चंद्रकांत भोजने, उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मंडळाच्या वतीने कृषी विद्यापीठ, राहुरी येथील सावित्रीबाई फुले विद्यालयास पुणे, सोलापूर व अहिल्यानगर या विभागातून 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' या स्पर्धेत द्वितीय क्रमांक व १५ लाख रुपये पारितोषिक प्राप्त झाल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे व पदाधिकारी यांच्या वतीने उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे व त्यांचे सहकारी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी सांगितले की, आंबीखालसाला निसर्गाची देणगी मिळाली असून यात अधिक भर घालण्याचे काम येथील सरपंच बाळासाहेब ढोले, बाळासाहेब गाडेकर आणि ग्रामस्थ करीत आहेत. समाजातील विविध सुखदुःखांच्या प्रसंगी आपल्या आवडत्या व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ झाडांचे रोपण करून त्यांच्या स्मृती कायम जागत्या ठेवाव्यात. कार्यक्रमाच्या अध्यक्षा छायाताई राजपूत यांनी आंबीखालसा गावाचे निसर्गप्रेम उधृत करून इतरांनी या गावाचा आदर्श व प्रेरणा घेण्याचे आव्हान केले. यावेळी तुकाराम जाधव, सुंदरदास करांडे, संदीप कुंभारे, उद्योजक ज्ञानेश्वर कहाने, दीपक ढमढेरे, मीनाताई मोरे, वंदनाताई भोजने आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब गाडेकर व बाळासाहेब ढोले यांनी निसर्गप्रेमींसाठी विरभद्र धबधबा पाहण्याचे व वनसहलीचे निसर्गमय वातावरणात आयोजन केले होते. विरभद्र मंदिर परिसरात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून स्नेहमेळाव्याची सांगता झाली.

वृत्त विशेष सहयोग

डॉ.शरद दुधाट, श्रीरामपूर 

संकलन

समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११

LightBlog

Pages