श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचालित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल,स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांनी दिपावलीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर येथील दि नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड अर्थात अंध व बहुविकलांग युनिटच्या विद्यार्थ्यांमार्फत बनविलेल्या दिपावली सजावट वस्तूंची खरेदी करून नुकताच अंध व बहुविकलांगांना आर्थिक मदतीचा हात दिला.
दरम्यान अंध व बहु विकलांग विद्यार्थ्यांनी विद्यानिकेतन स्टेट बोर्ड स्कूल येथे एकदिवसीय स्टॉलमध्ये आकर्षक रंगीबेरंगी आकाशकंदील, सुबक पणत्या, विद्युत रोषणाई करणाऱ्या दिव्यांच्या माळा तसेच घर सजावटीसाठी लागणाऱ्या आकर्षक वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. प्रसंगी विद्यानिकेतन शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी, शिक्षक,पालक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. व श्रीरामपूरकर वासियांच्या नजरेसमोर एक नवा आदर्श ठेवला. यावेळी अंध व बहुविकलांग युनिटचे संस्थापक विधिज्ञ बी.एफ. चुडीवाल, प्राचार्या विना आंबेडकर, कालिंदी नवथर,अश्विनी वैद्य, सुनिता काळे,विनोद ठोकळ उपस्थित होते.
या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके,व्हा.चेअरमन डॉ. प्रेरणाताई शिंदे,खजिनदार डॉ.राजीव शिंदे, सहसचिव डॉ.अर्चना शेळके, प्राचार्य विनोद रोहमारे,उपप्राचार्या भारती कुदळे, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या.
वृत्त विशेष सहयोग
शंकर बाहुले सर,श्रीरामपूर
संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११