राष्ट्रीय पातळीवर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मला सुवर्णपदक मिळाले,त्यामुळे वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले - प्रा. सुभाष देशमुख - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

26 October 2024

राष्ट्रीय पातळीवर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मला सुवर्णपदक मिळाले,त्यामुळे वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले - प्रा. सुभाष देशमुख


 

श्रीरामपूर / प्रतिनिधी:

माझे वडील यशवंतराव बाबुराव देशमुख (१५ फेब्रुवारी १९४४ ते ११ मे १९९१) हे सर्वसामान्य परिस्थितीत जगले पण मुलाने क्रीडाक्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त करावा अशी त्यांची तळमळ होती, त्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले, माझ्यासाठी क्रीडासाधने घेतली, आज राष्ट्रीय/ भारतीय पातळीवर या स्पर्धेत मला सुवर्णपदक मिळाले, त्यामुळे माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याचे अपूर्व समाधान मला आहे, असे भावपूर्ण उद्गार शारीरिक शिक्षण संचालक प्रा.सुभाष देशमुख यांनी काढले.

        येथील नगरपरिषद         उद्यानासमोर असलेला प्रा. देशमुख यांच्या जीममध्ये त्यांचा सत्कार सोहळा मित्रपरिवाराने आयोजित केला होता, त्यावेळी प्रा. देशमुख बोलत होते. याप्रसंगी माजी प्राचार्य टी.ई. शेळके, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, प्राचार्य डॉ. गोरख बारहाते, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे, प्रा. शिवाजीराव बारगळ, महाराष्ट्र बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी दत्तात्रय काशिद इत्यादी मित्रपरिवाराने प्रा. सुभाष देशमुख यांच्या क्रीडाक्षेत्रांतील अपूर्व         कामगिरीबद्दल सत्मानचिन्ह, शाल, पुस्तके, भेटवस्तू     देऊन सत्कार केले. 

याप्रसंगी प्राचार्य शेळके म्हणाले, प्रा. सुभाष देशमुख यांनी रयत शिक्षण संस्थेत प्रामाणिकपणे जिमखाना विभागाचे काम केले. रयतचे, श्रीरामपूरचे, कुटुंबाचे नाव मोठे केले, निर्व्यसनी राहून आणि आदर्श संस्कार जपत त्यांनी विद्यार्थी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकविले, विद्यार्थ्यांमध्ये जिमखाना विभागाची गोडी निर्माण केली. हसतमुख चेहरा आणि मनाचा निर्मळपणा जपत माणुसकीची मैत्री त्यांनी जपली असे सांगत जीममधील क्रीडासाधनाचे नाविण्यपूर्ण मांडणीचे त्यांनी कौतुकही केले. 

डॉ. उपाध्ये म्हणाले, प्रा. सुभाष देशमुख म्हणजे क्रीडांगणावरील प्रेरणास्थान आहे तर ते श्रीरामपूरचे क्रीडाभूषण आहेत.

प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांनी अपंग क्रीडापटूंचे प्रसंग सांगत मनाचे व शरीराचे सामर्थ्य स्पष्ट केले. 

प्राचार्य डॉ. गोरख बारहाते यांनी कॉमर्समधील जिमखाना विभागातील प्रा. देशमुखांचे कार्य सांगितले. सुखदेव सुकळे यांनी मनोगतात सांगितले की, प्रा. सुभाष देशमुख यांनी क्रीडाक्षेत्रात अपूर्व कार्य केले पण त्यांची कोणी फारशी दखल घेतल्याचे दिसत नाही, त्यांच्या सार्वजनिक सत्काराचे आयोजन लवकरच करू असे सांगत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांना चांगले यश मिळेल, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. दत्तात्रय काशिद यांनी एका आदर्श क्रीडापट्टू मित्राचे अनुभव सांगितले. सर्वांनी दर्जेदार जीम पाहत कौतुक केले.प्रा. सुभाष देशमुख यांनी रयत शिक्षण संस्थेत जिमखाना विभागातील विविध आठवणी सांगत अनेक विद्यार्थी क्रीडाक्षेत्रात चमकले, त्यांना विविध पदावर नोकऱ्या मिळाल्या. कोपरगांव कॉलेजला चांगले काम केल्याचे अनुभव सांगत नॅक मध्ये मानांकन मिळाले,    श्रीरामपूरच्या चंद्ररूप डाकले जैन वाणिज्य    महाविद्यालयात खूप क्रीडापटू लाभले,घडले. जिमखाना दर्जेदार करण्यात अनेकांचे सहकार्य लाभले. कुटुंबात आई, वडील,भाऊ, पत्नी,मुले यांचे सहकार्य लाभले. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात भेटलेल्या मित्रांमुळे खूप शिकता आले. मनात सदैव सकारात्मक ऊर्जा असली की समाधान मिळते. आपणास स्वतः फिट राहाता आले पाहिजे, जीममध्ये नियमित सराव करणे गरजेचे आहे. वय ५८ वर्ष पूर्ण झाली आहेत      तरीही ९३ किलो गटात १६० किलो वजन उचलण्याचे कौशल्य मिळविले आहे, यापुढे सप्टेंबरमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान लाभणार आहे, वडिलांनी स्वतःचा आजार बाजूला ठेवून माझ्या जीमला क्रीडासाधने पुरविली. आजारावर उपचार केले नाहीत. त्यातूनच त्यांना जगाचा लवकर निरोप घ्यावा लागला, त्याबद्दल खंत व्यक्त करीत भावनात्मक आठवणी सांगत, मित्रमंडळींनी दखल घेतली, हे समाधान        .  असल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले. 

हर्षवर्धन देशमुख यांनी नियोजन केले. अनेकांनी जीममध्ये व्यायाम साधनांचा अनुभव घेतला. प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी प्रा. देशमुख यांना लवकरच डॉक्टरेट पदवी मिळणार असल्याचे सांगत सर्वांतर्फे शुभेच्छा दिल्या. त्यांनी वृत्तपत्रातील विविध बातम्या वाचून , व्हिडिओ दाखवत, प्रा. देशमुख यांचे श्रीरामपुरातील क्रीडा क्षेत्रातील नंबर एक भूषणावह स्थान स्पष्ट करीत आभार मानले.

वृत्त विशेष सहयोग

ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगाव 

संकलन

समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११

LightBlog

Pages