विकास कामांतून जनसामान्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

17 October 2023

विकास कामांतून जनसामान्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध




तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार



अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा :

 वसा विकासाचा, विचार बहुजनांचा हा विचार आपण संपूर्ण राज्यभर मांडत आहोत. जनतेचा विकास हाच आपला ध्यास असून विकास कामातुन जनसामान्यांना सर्व सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली.



 पारनेर-अहमदनगर विधानसभा मतदारसंघात एलटी, एचटी ५६५  विद्युत वहिनी,१०० के.व्ही. च्या ३३६ रोहित्र उभारणीच्या कामाचे भूमिपूजन तसेच माता मोहटादेवी महिला देवदर्शन यात्रेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला.त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आमदार निलेश लंके, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदी मान्यवर उपस्थित होते.



अखंडित वीज पुरवठ्यासाठी विद्युत विकासावर भर


उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यातील जनतेला अखंडितपणे वीज पुरवठ्यासाठी विद्युत विकासावर भर देण्यात येत आहे. पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला तसेच सर्वसामान्य व्यक्तीला शाश्वत व अखंडितपणे वीजेचा पुरवठा व्हावा यादृष्टीने ३९ कोटी ६५ लक्ष रुपयांचा निधी खर्च करुन ११ के.व्ही. क्षमतेची  २७८ किलोमीटर लांबीची वीज वाहिनी टाकण्यात येत आहे. वीजेचा दाब आल्याने रोहित्रांवर ताण आल्याने ते नादुरुस्त होतात. सुरळीतपणे वीजेच्या पुरवठ्यासाठी १०० के.व्ही. क्षमतेचे ३३३ रोहित्रे बसविण्याबरोबरच ३१० किलोमीटर लांबीची  थ्री फेज लघुदाब वाहिनीचे कामही या निधीतून करण्यात येणार आहे. वाडी-वस्तीवरील जे ग्राहक शेती वाहिनीवर आहेत त्यांना गावठाणवाहिनीवर स्थलांतरीत करुन अखंडीतपणे वीजेचा पुरवठा करणे यामुळे शक्य होणार आहे. पारनेर तालुक्यातील सुपा, पारनेर, वाडेगव्हाण, भाळवणी, कान्हूरपठार, टाकळी ढोकेश्वर, वडझिरे परिसरातील वीज ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले.


तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही


पारनेर तालुक्याच्या विकासासाठी गतकाळात अकराशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीतून पाणी पुरवठा योजना, जलसंधारणांची कामे, पाझर तलाव, पाणंद रस्ते, क्रीडाविकास, आरोग्य विकास, विविध इमारती यासारखी विकास कामे करण्यात आली आहेत. नागरिकांची मागणी असलेल्या उपसा सिंचन योजना, कोल्हापुरी बंधारे, तीर्थक्षेत्र विकास,रस्ते विकास, औद्योगिक विकास यासारख्या विकास कामांनाही निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. पारनेर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाहीही उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी यावेळी दिली.


राज्यावरील दुष्काळाचे संकट टळू दे उपमुख्यमंत्र्यांचे मोहटादेवी चरणी साकडे


 राज्यातील काही भागात पावसाने ओढ दिली आहे. अनेक भागामध्ये चांगला पाऊस झाला आहेत काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे. राज्यातील काही भागांवर असलेले हे संकट टळू दे अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी मोहटादेवी चरणी साकडेही घातले. 


माता मोहटादेवीचे महिलांना दर्शन घडविण्याचे काम पुण्यांचे


लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मोहटादेवीचे महिलांना अखंडितपणे दर्शन घडविण्याचे  काम आमदार निलेश लंके हे गेल्या सात वर्षांपासून करत आहेत. भाविकांची देवीप्रती असलेली श्रद्धा  जपण्याचे श्री लंके यांचे काम उत्तम प्रकारचे व पुण्यांचे आहे.  लोकसेवेचा वसा घेऊन जनतेच्या विकासासाठी अहोरात्र करण्यात येणारे आमदार लंके यांचे काम हे खरोखरच कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.



आमदार निलेश लंके यांनी प्रास्ताविकात माता मोहटादेवी महिला देवदर्शन यात्रेबाबत तसेच मतदारसंघातील विकासकामांची माहिती विषद केली.


यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ११ के.व्ही. क्षमतेची २७८किलोमीटर लांबीची वीज वाहिनी, १०० के.व्ही. क्षमतेचे 333  रोहित्रे तसेच ३१० किलोमीटर लांबीची  थ्री फेज लघुदाब वाहिनीच्या कामाचे भूमीपुजन कोनशिला अनावरणाने करण्यात आले. तसेच माता मोहटादेवी महिला देवदर्शन यात्रेचा शुभारंभही करण्यात आला.कार्यक्रमास  तालुक्यातील पदाधिकारी, अधिकारी, महिला तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सहयोगी:

पत्रकार अंबादास जव्हेरी (सावेडी) अहमदनगर 

संकलन:

समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111 




LightBlog

Pages