बँक शाखा स्थलांतर रद्द करा ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

13 October 2023

बँक शाखा स्थलांतर रद्द करा ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण




माळवाडगांव/प्रतिनिधी :

श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगांव येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तालुक्यातील टाकळीभान येथे स्थलांतरप्रकरणी संतप्त झालेल्या माळवाडगांव, मुठेवाडगांव, खानापुर व भामाठान येथील बँकेच्या खातेधारक ग्रामस्थांनी मंगळवार दि.१७ रोजी श्रीरामपूर नेवासा राज्यमार्गावर खोकर फाटा येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. जोपर्यंत शाखा स्थलांतरचा ठराव रद्द करत नाही, तोपर्यंत रास्ता रोको आंदोलनासह विविध स्वरूपाचे तीव्र आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे निवेदनात ग्रामस्थांनी सांगितले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र शाखेने ग्रामस्थांसह खातेधारकांना कोणतेही प्रकारे विश्वासात न घेता माळवाडगांव येथील शाखेचे टाकळीभान येथील शाखेत स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. या शाखेत परिसरातील दहा   हजारांहून अधिक खातेदार आहेत. शाखेचे स्थलांतर होऊ नये यासाठी गावकऱ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे शाखा व्यवस्थापकांना लेखी निवेदन दिले आहे तसेच याबाबतीत १६ ऑक्टोबर पर्यंत निर्णय न घेतल्यास १७ ऑक्टोबर पासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 



------------------------------------------------------------


बँकेने थकीत कर्जाची वसुली सक्तीने करावी

       माळवाडगांव येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून कर्ज घेतलेल्या खातेधारकांची संख्या जास्त असली तरी थकीत कर्ज धारकांची संख्या मात्र हातावर मोजन्या इतकीच असल्याने या धन दांडग्या कर्ज थकवणाऱ्या खातेधारकांकडून बँकेने सक्तीने कर्ज वसुली करावी मात्र नियमित कर्ज फेडणाऱ्या तसेच बँकेला सहकार्य करणाऱ्या ग्राहकांना वेठीस धरण्याचा प्रकार बँकेने करू नये अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.

-------------------------------------------------------------

सहयोगी:

पत्रकार संदीप आसने - माळवडगांव

संकलन:

समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111 




LightBlog

Pages