नवरात्रोत्सवानिमीत्ताने भोकर येथील श्रीक्षेत्र रेणुकामाता देवस्थान येथे १५ आक्टेाबर पासून जाहीर हरीकिर्तन व गाथा पारायण सोहळा - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

13 October 2023

नवरात्रोत्सवानिमीत्ताने भोकर येथील श्रीक्षेत्र रेणुकामाता देवस्थान येथे १५ आक्टेाबर पासून जाहीर हरीकिर्तन व गाथा पारायण सोहळा




चंद्रकांत झुरंगे - भोकर :

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील श्रीक्षेत्र रेणुकामाता देवस्थान येथील शारदात्सोवा निमीत्ताने होणार्‍या जाहीर हरीकिर्तन महोत्सवाची तयारी पुर्णत्वाकडे असून रविवार दि.१५ आक्टोबर पासून येथील किर्तन महोत्सव व गाथा पारायण या सोहळ्यास आरंभ होत आहे. येथील रेणुकामाता मंडळाकडून श्रीक्षेत्र माहुरगड येथून प्रज्वलीत करून आणलेल्या ज्योतीने येथील दिपमाळेचे प्रज्वलन करून या सोहळ्यास आरंभ होत आहे. तर सांगता मंगळवार दि.२४ आक्टोबर रोजी येथील भागवताचार्य कु.आरतीताई शिंदे महाराज यांचे काल्याचे किर्तनाने होत आहे.

भोकर गावचे आराध्य दैवत, नवसाला पावणारे जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र रेणुकामाता देवस्थान येथे सालाबादप्रमाणे या वर्षीही शारदात्सोवनिमीत्ताने व नवरात्रौत्सवानिमीत्ताने भोकर येथील हा उत्सव सोहळा संपन्न होत आहे. श्रीक्षेत्र देवगडचे मठाधिपती महंत गुरूवर्य भास्करगीरीजी महाराज, श्रीक्षेत्र सराला येथील महंत रामगीरीजी महाराज, श्रीक्षेत्र देवगडचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगीरीजी महाराज यांचे कृपाशिर्वादाने तसेच येथील वैष्णव सेवाश्रमाचे मठाधिपती साहेबराव महाराज कांगुणे, श्री विठ्ठल सेवाश्रमाचे मठाधिपती सुदाम महाराज चौधरी, भागवताचार्य कु.आरतीताई शिंदे महाराज व भागवताचार्य संतोष महाराज पटारे यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेल्या या सोहळ्यात दररोज पहाटे ४ वा. काकडा भजन, सकाळी ६ वा. महाआरती, सकाळी ७ वा. गाथा पारायण, दुपारी १२ वा. येथील श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मीक विकास केंद्राचे वतीने सामुदायीक ‘दुर्गा शप्तसदी पाठ’, दुपारी ३ वा.जाहीर हरीकिर्तन, सायंकाळी ६ वा. हरीपाठ व सायंकाळी ७ वा. महाआरती व त्यानंतर फराळ प्रसादाचे अन्नदान या प्रमाणे हा सोहळा संपन्न होत आहे. येथील गाथा पारायणाचे व्यासपिठचालक म्हणून येथील भागवताचार्य संतोष महाराज पटारे व सुदाम महाराज चौधरी हे सेवा करत आहेत.

यात रविवार दि.१५ आक्टोबर रोजी भोकर येथील भागवताचार्य संतोष महाराज पटारे यांचे किर्तन, सोमवार दि.१६ आक्टेाबर सकाळी १० वा.समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, मंगळवार दि.१७ आक्टोबर रोजी राहुरी तालुक्यातील रामपुर येथील कु.शितलताई साबळे, बुधवार दि.१८ आक्टोबर रोजी श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगीरीजी महाराज, गुरूवार दि.१९ आक्टोबर रोजी कोपरगाव तालुक्यातील वारी शिंगवे येथील भागवताचार्य सौ.प्रतिक्षाताई जाधव महाराज, शुक्रवार दि.२० आक्टोबर रोजी बिड जिल्ह्यातील चकलंबा येथील एकनाथ महाराज गाढे, शनीवार दि.२१ आक्टेाबर रोजी बीड जिल्ह्यातील परळीबैजनाथ येथील भरत महाराज जोगी, रविवार दि.२२ आक्टोबर रोजी बीड येथील दिपक महाराज बादाडे, सोमवार दि.२३ आक्टोबर रोजी खैरिनिमगांव येथील बाळासाहेब महाराज रंजाळे यांचे किर्तन होत आहे.

त्यानंतर मंगळवार दि.२४ आक्टेाबर रोजी सकाळी ८ वा. दिंडी प्रदिक्षीणा व सकाळी ९ वा. येथील भागवताचार्य कु. आरतीताई शिंदे महाराज यांचे काल्याचे किर्तन व त्या नंतर महाप्रसादाचे अन्नदान होत आहे. या महाप्रसादाचे अन्नदान येथील लक्ष्मण उर्फ भाऊराव सुडके, हनुमाण पांढरे, सुभाष आहेर, मुस्साभाई पठाण, रतन काळे व सुनिल पटारे हे करत आहेत. 

तर दररोजच्या खिचडी फराळ महाप्रसादात नाष्टयाचे अन्नदान विजय खंडागळे, ऋषी छल्लारे व रविंद्र गायकवाड हे करत आहेत तर दररोजच्या खिचडी फराळात अन्नदानात मनोज शिंदे, मंगलताई ढाले, आण्णासाहेब चौधरी, नामदेव शिंदे, चंद्रकांत झुरंगे, भाऊसाहेब बेरड, सागर शिंदे, आगंणवाडी सेविका ग्रुप, भाऊराव पवार, बाबासाहेब दारूंटे, नथु डूकरे, रावसाहेब ढोकणे, शिवाजी खंडागळे, प्रभाकर राहींज, नानासाहेब हिवाळे, नवनाथ ढोकणे, लक्ष्मण ढाले, संजय लोखंडे, राजेंद्र छाजेड, ज्ञानेश्वर झिने, किशोर शिंदे, काशिनाथ चौधरी, दिगंबर काळे, बाळासाहेब म्हैसकर, तेजस तांदळे, आण्णासाहेब गांधले, नंदकुमार कांगुणे, ज्ञानदेव कोल्हे, विठ्ठल मते, हरीभाऊ साळुंके व राजेंद्र चव्हाण आदि सहभागी होत आहेत.



भोकर येथील श्रीक्षेत्र रेणुकामाता मंदिर प्रांगणात उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न होत असलेल्या या भक्ती सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होवून लाभ घ्यावा असे आवाहन श्री रेणूकामाता नवरात्र उत्सव कमेटी, समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ यांनी केले आहे.

संकलन:

समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111 




LightBlog

Pages