अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा :
वॉक फॉर इंडीया पदयात्रेचे दि. १४ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८.३० आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणातून सुरू होणाऱ्या या पदयात्रेच्या कार्यक्रमाचा शुभारंभ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या पदयात्रेस अधिकाधिक व्यक्तींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव भाग्यश्री पाटील यांनी केले आहे.
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111