बेलापूर प्रतिनिधी :
सायबर सिक्युरिटी मध्ये काम करायचे असेल तर दहावीनंतरच क्षेत्र निवडावे लागेल असे उद्गार संजीवनी पॉलिटेक्निक कॉलेजचे विद्यार्थी प्रशांत काळापहाड यांनी काढले.बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात करियर गायडन्स, ग्रीव्हन्स सेल , विद्यार्थी विकास मंडळ आणि सावित्रीबाई फुले विद्यार्थीनी मंचच्या वतीने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. ते पुढे असेही म्हणाले की, विज्ञान शाखेचा अभ्यास करावा लागेल.अनेक प्रकारचे कोर्सेस करून सायबर सिक्युरिटी म्हणून काम करावे किंवा इथिकल हॅकर्स म्हणून काम करावे त्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, संगणक ,गणित इ.विषयांचे ज्ञान असावे.कष्ट केले तर विकासाच्या संधी चालून येतील असेही ते म्हणाले.उद्घाटन सत्र झाल्यानंतर आयुष राठी,यश काकलीज, मैत्रेयी कुलकर्णी,दिप्ती खंडुजा, अनुष्का मगर,एमडी आबु सालेम अलम,आदित्य कुकडे,आदित्य महाले या सर्वांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ.गुंफा कोकाटे यांनी सोशल सेक्युरिटी बाबत माहिती दिली. संगणक तज्ज्ञ ,माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ ,सुरक्षा अधिकारी, सुरक्षा ऑडिटर ,अर्ज सुरक्षा अधिकारी,सुरक्षा विश्लेषक , सायबर सुरक्षा तज्ज्ञ अशा संधी विद्यार्थ्यांना मिळू शकतात असे सांगितले.यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून व्यासपीठावर महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड,संजय राठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागाचे डॉ .मनोज तेलोरे यांनी केले.
सुत्रसंचलन जया काळे व माधवी मेहेत्रे यांनी केले तर प्रा.ओंकार मुळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्रा.सुनिता पठारे,प्रा.अशोक थोरात यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवकांनी परिश्रम घेतले.सदर कार्यशाळेचा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.
सहयोगी:
पत्रकार अमन सय्यद - बेलापूर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111