अशोकनगर प्रतिनिधी :
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शनिवार एशियन गेम्समधील सुवर्णपदाक विजेत्या कबड्डी संघाचा खेळाडू अस्लम इनामदार याचेसह अहमद इनामदार, अजित पवारव शिवम पाटारे या गुणवंत खेळाडूंचा महाविद्यालच्या वतीने संस्था पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.सत्कारमूर्ती खेळाडू अशोक महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.
अस्लम इनामदार या खेळाडूंने एशियन गेम्स मध्ये भारतीय कबड्डी संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला.तसेच अजित पवार या खेळाडूंने १० व्या प्रो कबड्डी सीजन साठी तेलगु टायटन संघासाठी, शिवम पाटारे याची प्रो कबड्डीसाठी हरियाना टिलर संघात तसेच अहमद इनामदार याची प्रो कबड्डीसाठी पुणेरी फल्टन संघात निवड झाली. या सर्व गुणवंत खेळाडूंचा महाविद्यालच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .
यावेळी अस्लम इनामदार याने आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे उपाध्यक्ष योगेश विटनोर व सचिव सोपानराव राऊत यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ सुनीता गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी मेजर वसीम इनामदार, पांडुरंग पवार,अनिल पटारे, परीक्षा अधिकारी प्रा. दिलीप खंडागळे यांचेसह महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच कार्यालयीन अधीक्षक बाबासाहेब पटारे शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा दिलीप साळुंके यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. दिलीप खंडागळे यांनी केले आणि आभार प्रा.रविंद्र वारुळे यांनी मानले.
सहयोगी:
पत्रकार शेख अन्सार हानिफभाई, श्रीरामपूर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111