वॉक फॉर फ्रीडम पदयात्रा मानवी तस्करीविरुद्ध समाजात चेतना निर्माण करेल- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

14 October 2023

वॉक फॉर फ्रीडम पदयात्रा मानवी तस्करीविरुद्ध समाजात चेतना निर्माण करेल- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा


 


अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा :

मानवी तस्करीविरुद्ध समाजामध्ये जागृती व्हावी यासाठी जगभरामध्ये एकाचवेळी वॉक फॉर फ्रीडम ही पदयात्रा आयोजित करण्यात येते. अहमदनगरमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेली ही पदयात्रा मानवी तस्करीविरुद्ध  समाजात चेतना निर्माण करेल असा विश्वास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी व्यक्त केला.



अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात वॉक फॉर फ्रीडम या पदयात्रेस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या हस्ते झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी प्रमुख न्यायाधीश सुनील गोसावी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव भाग्यश्री पाटील, अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष एड. संजय पाटील,पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव, अनिल कातकडे,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य ऍड. भूषण बराटे,ऍड. अभय राजे, ऍड. सुनील मुंदडा, ऍड. अनिल सरोदे, प्रवीण मुत्याल,स्नेहालय संस्थेचे ऍड. श्याम असवा,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी पी.बी. वारूडकर, शिक्षणाधिकारी अशोक कडूस,पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदांन, डॉ.डावरे  आदी उपस्थित होते.

    प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा म्हणाले की,  समाज माध्यमाच्या वापरातून अनेक गैरप्रकार होत असल्याचे आपणास दिसून येते. अनेकवेळा समाज माध्यमावर अनोळखी व्यक्तींशी निर्माण झालेल्या जवळीकतेचे  रूपांतर मानवी तस्करीच्या घटनांमध्ये होत असल्याच्या घटना घडत आहेत. यासाठी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. आपल्याला मिळालेल्या आयुष्याचा उपयोग आपले अस्तित्व निर्माणासाठी करा. थोर महापुरुषांचे विचार आत्मसात करत आयुष्याचे ध्येय ठेवून वाटचाल करा. मुलांच्या मदतीसाठी १०९८ हा हेल्पलाईन क्रमांक निर्माण करण्यात आला असून अडचणीच्या वेळी या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करत अत्याचारग्रस्त महिला व बालकांसाठीच्या मनोधैर्य योजनेबद्दलही त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव भाग्यश्री पाटील  पदयात्रा आयोजनामागची भूमिका विषद केली.



पदयात्रेमध्ये महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी विद्यार्थ्यांचा सहभाग

मानवी तस्करीविरुद्ध पहिल्यांदाच काढण्यात आलेल्या पदयात्रेची जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणातून सुरुवात होऊन डीएसपी चौक, तारकपूर बसस्टँड मार्गे परत जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात येऊन विसर्जित करण्यात आली.

या पदयात्रेत विविध महाविद्यालय व शाळांमधील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या हातामधील मानवी तस्करीविरुद्धचे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.

यावेळी उपस्थितांना मानवी तस्करीविरुद्धची शपथही  देण्यात आली. या पदयात्रेस विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, सर्व न्यायिक अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विध्यार्थी, विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


सहयोगी:

पत्रकार रमेश जेठे (सर)

संकलन:

समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111 




LightBlog

Pages