अशोकनगर प्रतिनिधी :
अशोक उद्योग समुहाचे सूत्रधार व चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील अशोक सहकारी साखर कारखान्याचा सन २०२३-२४ च्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ सोमवार (दि.१६) रोजी सकाळी १० वा. अशोक कारखान्याचे व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे काका यांचे हस्ते संपन्न होणार आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष देवकर यांनी सांगितले की, अशोक सहकारी साखर कारखान्याचा सन २०२३ -२४ या वर्षीचा गळीत हंगाम लवकरात लवकर सुरु करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने ऑफ सिझनमधील देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण करुन हंगाम निर्धारित वेळेत सुरु करण्याची तयारी झाली आहे. कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ सोमवार दि.१६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. संपन्न होत आहे.यानिमित्त कारखान्याचे संचालक अमोल कोकणे व त्यांच्या पत्नी सौ.प्रतिक्षा कोकणे तसेच कारखान्याचे डिस्टीलरी इनचार्ज बाबासाहेब हापसे व त्यांच्या पत्नी सौ.आशाबाई हापसे या दाम्पत्यांचे हस्ते विधीवत पूजन करण्यात येणार आहे.
सदर प्रसंगी कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक व हितचिंतक आदिंनी उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यकारी संचालक संतोष देवकर तसेच संचालक मंडळाचे सदस्यांनी केले आहे.
सहयोगी:
पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111