श्रीरामपूर प्रतिनिधी :
इंदिरानगर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे भारतरत्न,माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त केला जाणारा वाचन प्रेरणा दिन परिसंवाद,पुस्तक प्रकाशन, कविसंमेलन असे विविध उपक्रम आयोजित केले असल्याची माहिती संयोजकातर्फे देण्यात आली.
१५ ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन हा वाचन संस्कृती वाढविण्यासाठी एक प्रेरणादायी दिवस आहे. पुस्तके ही आपली जीवनसंस्कृती आहे.यादृष्टीने हॆ उपक्रम होणार आहेत.प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये, उपाध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे, संगीता फासाटे, कोषाध्यक्ष सौ. मंदाकिनी उपाध्ये, कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये, सचिव सौ. आरती उपाध्ये इत्यादीतर्फे ह्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी १० वाजता हॆ उपक्रम होणार आहेत.
सहयोगी:
पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111