बी.आर.चेडे - शिरसगांव :
केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या द्वारे व गोदागिरी फार्म आणि बालाजी उद्योग समूह यांच्या मदतीने शिरसगाव येथे एक दिवसीय विनामूल्य मधमाशी जनजागृती कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विजय देशमुख तर अध्यक्ष म्हणून भास्कर ताके उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिरसगांवातील ग्रामस्थ, न्यू इंग्लिश स्कूल शिरसगांव येथील विद्यार्थी व आर. बी. एन. बी. महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र विभागाचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये मधमाशी पालक- उद्योजक ऋषिकेश औताडे व सौ. अमृता देशमुख यांनी मधमाशी पालन व त्याविषयीची माहिती उपस्थितांना दिली. सदर कार्यक्रमासाठी यू.के. आढाव, एच.जी. चव्हाण, बाबासाहेब कदम, अण्णासाहेब ताके, सोपान गवारे, श्रद्धा देशमुख, बापूसाहेब जाधव, बडाख, गवारे व ग्रामपंचायत शिरसगाव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111