शिरसगांव प्रतिनिधी :
मानवी जीवन समृद्ध करण्याचे कार्य हॆ ज्ञानशीलतेमुळे गतिशील झाले.अंधारातून प्रकाशवाट दाखवण्याचे सूत्र पुस्तक वाचनातून दिसते.अशी वाचन संस्कृती ही सर्वांगीण मानवी विकासाची गुरुकिल्ली आहे, असे विचार रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगांव येथील खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित वाचन प्रेरणा दिवसच्या विविध उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक भागवतराव मुठे पाटील होते.प्रारंभी श्रीसरस्वतीमाता, भारतरत्न, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम स्व.खासदार गोविंदराव आदिक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.प्राचार्या सुमतीताई रावसाहेब औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम घेतले गेले. श्रीमती पूजा त्रिभुवन यांनी स्वागत केले. राजन वधवानी यांनी अध्यक्ष निवड केली. सौ. स्नेहल लबडे यांनी अनुमोदन दिले. विश्वनाथ भाऊसाहेब बडाख यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. संजय भानुदास शिंदे व दिलीप लहानू गवारे यांनी पाहुण्यांचे शाल, बुके देऊन सत्कार केले. शिक्षिका सौ. संगीता बाळासाहेब घोडे, विद्यार्थिनी कु. पूनम जाधव, कु. प्रज्ञा गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.डॉ. बाबुराव उपाध्ये आणि मुख्याध्यापक भागवतराव मुठे पाटील यांनी शाळेसाठी व उपस्थितांना पुस्तके भेट देऊन वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी भारतरत्न,मिसाईलमॅन, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र सांगून त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाचन प्रेरणा दिवस साजरा केला जातो याबद्दल संयोजकांचे कौतुक केले.एक निर्मळ मनाचे देशभक्त, परिश्रमातून आकाराला आलेले आदर्श व्यक्तिमत्व आणि पुस्तकावर जीवापाड प्रेम करणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम म्हणजे प्रत्येक भारतीय माणसाला दिशादर्शक असणारे व्यक्तिमत्व होते, असे सांगून पुस्तकं हीच जीवनाची अमृतसरोवरे असून त्यातून जीवन समृद्ध करावे असे आवाहन केले. उंदीरगाव येथील भाऊसाहेब घोडे पाटील, उत्तमशेट स्वरुपशेठ छल्लाणी, विनायकराव गलांडे पाटील यांनी दिलेला आधार यामुळे माझ्यासारख्या पोरक्या पोराचे शिक्षण झाले.उंदीरगाव हॆ माझ्या जीवनातील एक ज्ञानतीर्थ असून तेथेच मला वाचन, शिक्षण आणि जीवनअनुभव मिळाले असे सांगून कविता सादर केली. मुख्याध्यापक भागवतराव मुठे पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून स्व.गोविंदराव आदिक, डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनप्रेरणादायी आठवणी सांगितल्या.
शिरसगावची शाळा एक आदर्श शाळा असून येथील शिक्षक अतिशय गुणशील असल्याबद्दल कौतुक केले. अविनाश आदिक, मा. नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांचे प्रभावी नेतृत्व, स्व. जी.के. बकाल पाटील यांच्या सेवासंस्काराचे संदर्भ सांगितले. मुलांनी वाचले तरच पुढे त्यांचे जीवन वाचेल असे वाचन संस्कृतीचे महत्व विशद केले.श्रीमद भागवत ग्रन्थाचे विवरण केले. सूत्रसंचालन पूजा त्रिभुवन यांनी केले तर गणेश साहेबराव पंडित यांनी आभार मानले.
सहयोगी:
बी.आर.चेडे - शिरसगांव
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111