विद्यानिकेतन अकॅडमी आयोजित "फूड फेस्टिवल ला"उदंड प्रतिसाद - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

16 October 2023

विद्यानिकेतन अकॅडमी आयोजित "फूड फेस्टिवल ला"उदंड प्रतिसाद




श्रीरामपूर प्रतिनिधी :

विविध स्वादिष्ट पदार्थांनी सुसज्ज असे स्टॉल्स, विद्यार्थ्यांनी केलेली शिस्तबद्ध तयारी, पालकांची खरेदीसाठीची लगबग, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असलेला आनंद व समाधान हे सर्व चित्र पहावयास मिळाले श्रीरामपूरातील पहिल्या मान्यताप्राप्त सीबीएससी विद्यानिकेतन अकॅडमी या स्कूलमध्ये ! निमित्त होते  विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या फूड फेस्टिवलचे !

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कटीबद्ध असणारी संस्था म्हणून विद्यानिकेतन अकॅडमी या संस्थेचे जिल्ह्यात नाव प्रसिद्ध आहे. वार्षिक नियोजनानुसार दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणात वाढ करणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यवहारिक शिक्षण शिकवून भारताचा सुजान नागरिक बनविणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

यावर्षी आयोजित केलेल्या "फूड फेस्टिवलचा" मानसही असाच आहे. विद्यार्थ्यांमध्ये कष्टाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यात विक्री कौशल्य वाढावे, व्यावहारिक ज्ञानाची भर पडावी, स्वच्छतेचे महत्त्व कळावे, आत्मविश्वास वाढावा, ग्राहकाभिमुख सेवा कशी द्यावी याचे ज्ञान यावे, हा हेतू ठेवून विद्यानिकेतन अकॅडमी ने या महोत्सवाचे आयोजन केले. या महोत्सवाला पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

शनिवारी या फेस्टिवलचे आयोजन शाळेच्या कॅम्पस मध्ये करण्यात आले होते. महोत्सवाचे उद्गघाटन संस्थेचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई.शेळके सर व्हा. चेअरपर्सन डॉक्टर प्रेरणाताई शिंदे, खजिनदार डॉ.राजीव शिंदे, श्रीरामपूरचे डी.वाय.एस.पी. श्री.बसवराज शिवपुजे साहेब, डॉक्टर अर्चना शेळके, पंचायत समिती शिक्षण विभागाचे श्री शेंडगे साहेब  प्राचार्या सौ.रंजना जरे, उपप्राचार्या सौ. वर्षा धामोरे, समन्वयक श्री.अमित त्रिभुवन, कार्यालयीन अधीक्षक श्री.सतिश थोरात व सर्व पालक शिक्षक संघाचे सदस्य यांच्या हस्ते पार पडले.

उद्घघाटनानंतर पाहुण्यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पदार्थांच्या स्टॉलला भेट देऊन फूड फेस्टिवलचा मनमुराद आनंद लुटला. प्रत्येक स्टॉलवर एका चढ एक चवीचे पदार्थ उपलब्ध होते. श्रीरामपूरचे डी वाय एस पी श्री. शिवपुजे साहेब यांनी शाळेने अत्यंत छान उपक्रम राबविल्याबद्दल शाळेच्या व्यवस्थापनाचे व विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. या फेस्टिवलचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे या फेस्टिवल मध्ये विक्रीसाठी असणारे सर्व पदार्थ मुलांनी स्वतः बनवून आणले व स्वतः विकले. विक्रीसाठी अत्यंत सुबक व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक विक्री स्टॉलवर टोकन सिस्टीम राबवून ग्राहकांना पैसे देऊन पहिले टोकन घेणे बंधनकारक असायचे व तदनंतर मेनू काउंटरला जाऊन खरेदी करावी लागायची. प्रत्येक स्टॉलवर ऑनलाइन पेमेंट स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली होती. स्टॉल वरील प्रत्येक विद्यार्थ्यांनी हेअर कॅप, हँड ग्लोज, मास्क या सर्वांचा वापर केला. सर्वात शेवटी प्रत्येक स्टॉल धारकाने कस्टमर फीडबॅक रजिस्टर मेंटेन केले व त्यावर रेटिंग पाईंट मिळविले.या सर्व नियोजनाबद्दल उपस्थित पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले.

अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होऊन समाजात कसे राहावे याबद्दल समज येते. असे प्रतिपादन श्रीरामपूर न्यायालयाचे न्यायाधीश खराडे साहेब, कांबळे साहेब व पटेल मॅडम यांनी केले. दुपारच्या सत्रात माननीय न्यायमूर्ती साहेबांनी स्टॉलला भेट दिली.सोयाबीन चिली, सँडविच, ओली भेळ, ढोकळा, दाबेली, पावभाजी,चना चॅट,पाणीपुरी, चोको बिस्किट्स, कोल्ड कॉफी, व इतर अनेक पदार्थ या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण होते त्याचप्रमाणे या महोत्सवात ऑनलाईन गेम झोन व इतर इंनडोअर गेम्स सुद्धा अतिशय रंगत आणली.

या उपक्रमासाठी संस्थेच्या व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर प्रेरणाताई शिंदे यांनी देखील त्यांच्या व्यस्त कामकाजातून वेळ देऊन भेट दिली व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तसेच शालेय व्यवस्थापनाचे कौतुक केले.

या कार्यक्रमाच्या शेवटी अनेक पालकांनी प्रत्यक्ष भेटून कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाल्याबद्दल शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे मनापासून आभार व्यक्त केले व दरवर्षी अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यासाठी आग्रह धरला.



या कार्यक्रमास राज्याचे माजी महसूल मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब थोरात, उपाध्यक्ष श्रीमती शशिकलाताई शिंदे, चेअरमन टी. ई.शेळके सर, डॉक्टर प्रेरणाताई शिंदे डॉक्टर राजीव शिंदे, एडवोकेट भागचंदजी चुडीवाल, श्री. प्रकाश निकम पाटील, मंगलाताई आढाव, शुभांगीताई देवकर, डॉक्टर अर्चना शेळके,श्री. संजू भाई शहा यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

सहयोगी:

पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर

संकलन:

समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111 




LightBlog

Pages