शब्दगंध ही विचारपीठ मिळवून देणारी साहित्य चळवळ - बापूसाहेब भोसले - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

15 October 2023

शब्दगंध ही विचारपीठ मिळवून देणारी साहित्य चळवळ - बापूसाहेब भोसले




अहमदनगर प्रतिनिधी :

छोट्याश्या घडी पत्रिके पासून सुरू झालेला साहित्यिक प्रवास आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यापर्यंत पोहोचलेला असून शब्दगंध ही खऱ्या अर्थाने नवोदित साहित्यिकांसह मान्यवरांनाही विचारपीठ मिळवून देणारी साहित्यिक चळवळ झाली आहे असे प्रतिपादन शेवगांव पंचायत समितीचे माजी सभापती बापूसाहेब भोसले यांनी केले.



    शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने पंधराव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनानंतर कोहिनूर मंगल कार्यालयात शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विचारपीठावर शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी, अहमदनगर महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी मेहर लहारे, संयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजय कळमकर, कवी चंद्रकांत पालवे,डॉ. शंकर चव्हाण,प्रा. मेधाताई काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.



    पुढे बोलताना बापूसाहेब भोसले म्हणाले की, शेवगाव महाविद्यालयात असताना या मुलांनी सुरू केलेली साहित्यिक चळवळ आता सर्व दूर पसरली असून अनेकांना शब्दगंध ने लिहिते केले आहे. नवोदितांसाठी सुरू झालेली ही चळवळ आता प्रतिष्ठित साहित्यिक चळवळ झाली आहे, त्यामुळेच महाराष्ट्रातील अनेक नामवंत शब्दगंध च्या संमेलनास हजेरी लावतात. यावर्षीचे संमेलन अतिशय दिमाखदार झाले असून सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या कष्टाचे चीज झाले आहे.आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी छायाचित्र,चित्रकला,शिल्प कला आणि नाट्यकर्मिंचा सुरेख मेळ घातला.रसिकांची वाहवा मिळविली.

    डॉ. संजय कळमकर यावेळी बोलताना म्हणाले की, नव्या जुन्यांचा सुरेख संगम शब्दगंधने घालून संमेलन उत्तम प्रकारे यशस्वी केले आहे. शब्दगंध ही चळवळ प्रत्येकालाच आपली चळवळ वाटत असल्याने अधिकाधिक लेखक कवी यामध्ये सहभागी होत आहेत. यावेळी प्रा.डॉ.शंकर चव्हाण,चंद्रकांत पालवे, मेधाताई काळे,ज्ञानदेव पांडुळे,मेहर लहारे यांनी मनोगत व्यक्त केले.

    पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये लेझीम पथक घेऊन आलेले लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेचे प्रदीप पालवे, शिवाजी लंके,समन्वयक म्हणून भूमिका पार पाडलेले प्रभाग अधिकारी मेहर लहारे व सौ.सुनीता लहारे, वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्नशील असलेले प्रा.डॉ. किशोर धनवटे, कवयित्री स्वाती पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला.



    भगवान राऊत यांनी स्वागत केले तर शर्मिला गोसावी यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले. शेवटी संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी आभार मानले. नवजीवन प्रतिष्ठानच्या वतीने शब्दगंधच्या युवा टीमचे खास अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.डॉ. अशोक कानडे, रज्याक शेख, अरुण आहेर, राजेंद्र चोभे, दादू साळवे,बाळासाहेब शेंदूरकर,पी. एन.डफळ, जयश्री मंडलिक, स्वाती ठुबे, माधुरी पाटील, शाहिर भारत गाडेकर, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन सुरेश मिसाळ, दिगंबर गोंधळी, सुजाता पुरी,सुजाता पवार,गणेश भगत, मारुती सावंत,कल्याणी सावंत,संगीता गिरी,आरती गिरी, राजेंद्र पवार, ऋषिकेश पांडुळे, अशोक पवार, सत्यप्रेम गिरी डॉ. अनिल गर्जे, सुनिता लहारे, डॉ.तुकाराम गोंदकर,डॉ.रमेश वाघमारे, रवींद्र कानडे,सरला सातपुते, वर्षा भोईटे,जयश्री झरेकर, ऋषिकेश राऊत, श्यामा मंडलिक, सुरेखा घोलप, स्नेहल रूपटक्के, वसंत डंबाळे,माजी नगरसेवक श्रीनिवास बोजा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सहयोगी:

पत्रकार अंबादास जव्हेरी (सावेडी) अहमदनगर

संकलन:

समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111 




LightBlog

Pages