श्रीरामपूर प्रतिनिधी :
सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री शक्ती ग्रुपच्या वतीने नवरात्री उत्सवानिमित्त दिनांक २२ ऑक्टोबर रोजी जोडी दांडिया व २३ ऑक्टोबर रोजी ग्रुप दांडियाचे वेळ सायंकाळी ६:०० ते १०:०० या कालावधीत उत्सव मंगल कार्यालय श्रीरामपूर या ठिकाणी भव्य आयोजन केले आहे. याप्रसंगी मा नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे व मा नगराध्यक्षा श्रीमती राजश्रीताई ससाणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. श्री शक्ती ग्रुपच्या संस्थापिका, महाराष्ट्र राज्य प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस सौ.दिपालीताई ससाणे यांनी जास्तीत जास्त महिला भगिनींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. श्री शक्ती ग्रुप आयोजित दांडिया स्पर्धेचे हे सहावे वर्ष असून या स्पर्धांमध्ये महिलांना सर्वोत्तम दांडिया सादरीकरणासाठी सोन्याची नथ व इतर रोख स्वरूपातील भरपूर बक्षिसे व सन्मानचिन्हे देण्यात येणार आहे.
श्री शक्ती ग्रुप च्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. महिलांच्या या आनंद उत्सवानिमित्त दांडिया स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रिंकल रमाणी - ९३२६५७५३९३ व माधुरी कोकाटे - ९५२७१५१९३० यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त महिला भगिनींनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन श्री शक्ती ग्रुप च्या वतीने करण्यात आले आहे.
सहयोगी:
पत्रकार शेख अन्सार हानिफभाई - श्रीरामपूर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111