प्रतिनिधी- नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक श्रीरामपूर शाखेच्या मार्गदर्शक पदी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन बँकेच्या भावी वाटचालीस निश्चितच दिशादर्शक ठरणार असल्याचे नामको बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी म्हटले आहे. श्री विलास काका लबडे, श्री विजय गांधी, श्री पंकज छल्लाणी व श्री संतोष चोरडिया यांची करण ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक श्रीरामपूर शाखेच्या मार्गदर्शक पदी निवड झाली त्याप्रसंगी ससाणे बोलत होते. यावेळी नवनिर्वाचित मार्गदर्शक पदाधिकाऱ्यांनी बँकेच्या सक्षमीकरणास व भावी प्रगतीस हातभार लावणार असल्याचे सांगत निवडीबद्दल करण ससाणे यांना धन्यवाद दिले.
याप्रसंगी मा नगरसेवक आशिष धनवटे, रितेश रोटे,मनोज लबडे, प्रवीण नवले, शाखा अधिकारी चाबुकस्वार, अजय धाकतोडे, योगेश बडदे,संकेत संचेती, नामको बँक श्रीरामपूर शाखेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
सहयोगी:
पत्रकार राजू मिर्झा - श्रीरामपूर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111