शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष
ऍड.अजित काळे यांचा इशारा
नेवासा प्रतिनिधी :
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात श्रीरामपूर नंतर गाव तेथे शेतकरी संघटनेची शाखा स्थापनेचा संकल्प जिल्हा अध्यक्ष अनिल औताडे यांनी केला आहे. या शेतकरी एकाजुटीच्या कार्यात संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ तुवर, नेवासा ता. अध्यक्ष त्रिंबक भदगले, उपाध्यक्ष बाबासाहेब नागोडे, संपर्क प्रमुख नरेंद्र काळे, युवा आघाडीचे डॉ. रोहीत कुलकर्णी, संपर्क प्रमुख किरण लांडे ही तालुका कमेटी शाखा स्थापनेसाठी व शेतकरी प्रश्न सोडवीण्याच्या कार्यात मोलाची कामागिरी करत आहे.
रविवार दि.१५ ऑक्टोबर २०२३ रोजी गोगलगाव , गणेशवाडी, लांडेवाडी आणि करजगाव येथे ऍड.अजित काळे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली शाखा स्थापन केल्या. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या छातीला शेतकरी संघटनेचे बॅच लावून प्रवेश केला. यावेळी अजित काळे म्हणाले की ' राज्यात गेली दहा वर्षापासून राजकीय पक्ष व पक्षातील नेते सोयीस्कररित्या शेतकरी विचारधारेपासून बाजूला गेले असलेचे सिद्ध झाले आहे. सहकारापासून विधानसभा -लोकसभा पर्यत विचाराला तिलांजली देऊन आघाडी तडजोडी फक्त सत्ता मिळावयाच्या आणि मिळावलेल्या सत्तेतून शेतकऱ्यांचे शोषण करायचे असा एक कलमी कार्यक्रम चालू आहे विधानसभेतील आपले प्रतिनिधी आपले प्रश्न मांडत नसलेची खंत यावेळी ऍड. काळे यांनी व्यक्त केली. २०१७ च्या फडणविस सरकारने पोर्टल बंद करून छत्रपती सन्मान योजनेत शेतकरी पात्र असून जाणीव पूर्वक वंचित ठेवले याबाबत आपण उच्च न्यायालयाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना सहा हजार कोटींचा न्याय मिळावून दिला.सरकार कडून उच्च न्यायालयाच्या आदेशाचाही भंग होत असून आपण राज्य शासनाविरोधत अवमान याचिका दाखल केली आहे,त्याचबरोबर राष्टीयकृत बँकेप्रमाणे जिल्हा बँकेनेही एक रकमी कर्ज परत फेड योजना राबवावी म्हणून उच्चं न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळावून देणेसाठी अहमदनगर जिल्हा बँकेच्या विरोधात जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या वतीने भांडत आहे.पुढील महिन्यात उसाचा गाळप हंगाम सुरु होत असून एकही कारखाना दर घोषित करत नसल्याले मा. रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वात ऊसाला रु. ५००० /- प्रति टन भाव मिळावून देणेसाठी लवकरच ऊस परिषदेचे आयोजन करणार असून यामध्ये कर्जमुक्ती बाबतही भूमिका घेणार आहोत.
या वेळी जिल्हाध्यक्ष अनिल औताडे म्हणाले की, मागील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप शिवसेना या पक्षाने केंद्राच्या मनमोहनसिंगव व राज्याच्या फडणविस आणि ठाकरे सरकारने शेतकऱ्याची फसवणूक केली आहे. शेतकरी कर्जेमाफी योजनेत रकमेची तारखेची व क्षेत्राची अट लादल्यामुळे योजनेचा शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. राज्यातील शेतकऱ्यांचा आता राज्यातील कोणताही राजकीय पक्षावर विश्वास राहिला नसून शेतकरी संघटना बी. आर. एस च्या माध्यमातून शेतकरी प्रश्न सोडवीण्यासाठी राजकीय पर्याय मा. रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वात देणार असून,
एकच नारा - साताबारा कोरा
पिकलं तवा लुटलं - देण घेणं फिटलं
कर कर्जा नहीं देंगे - बिजली का बिल भी नहीं देंगे !!
अश्या घोषणा आपल्या समारोप भाषणात दिल्या.
नेवासा ता.अध्यक्ष त्रिंबक भदगले म्हणाले की, 'या तालुक्यात सहकारच्या माध्यमातून सहकारतील नेते व त्यांचे नातेवाईक कारखान्याच्या व बँकेच्या ताब्यात असलेल्या संस्थेतून शेतकऱ्याचे शोषण करत असून आपण संघटनेच्या माध्यमातून संघर्ष करणार असलेचे आ. शंकराराव गडाख यांचे नाव न घेता उल्लेख केला.
यावेळी बाबासाहेब खराडे, भास्कर तुवर, विश्वास मते, अनिल मते, नारायण मते, ढगे साहेब किरण लंघे अशोक नागोडे, कल्याणराव मते,पुरुषोत्तम सर्जे, शंकर लांडे, कानिफनाथ लांडे, करजगाव येथील मेजर अशोक काळे, बाळासाहेब कंक, गंगाधर टेमक आदी मोठया संख्येने उपस्थित होते.
सहयोगी:
पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव ता.श्रीरामपूर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111