श्रीक्षेत्र भोकर येथील नवरात्रोत्सवा निमीत्ताने गाथा पारायण व किर्तन सोहळा उत्साहात सुरू
चंद्रकांत झुरंगे - भोकर :
निवडणुका आल्याकी राजकारणी तुमचा वापर करून घेतात, तुम्ही राजकारण करा पण जरा भान ठेवून, भानावर येवून राजकारण करा, राजकारणासाठी रक्ताची नाते तोडू नका. सध्या काहींनी खरं बोलणारा समाज दाबून मारला. हे कीती दिवस चालणार? मी फक्त खरं बोलतो म्हणून मी गोत्यात येतोय हे मला ही समजतयं, पण माझा शब्द आज खरा आहे, उद्या ही खराच राहणार आहे कारण खरं ते खरंच असतयं. कुणाला तरी खरं बोलू द्या, नाही तर धर्म संपेल. खरं बोलणारी माणसं संपविली तर धर्म कसा टिकेल याचा विचार करा करा? असे आवाहन समोज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केले.
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे नवरात्रोत्सवानिमीत्ताने सुरू असलेल्या व मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या गाथा पारायण व किर्तन महोत्सव प्रसंगी उपस्थीतांना उपदेश करताना ते बोलत होते. यावेळी येथील व्यासपिठचालक भागवताचार्य संतोष महाराज पटारे, सुदाम महाराज चौधरी, निवृत्ती महाराज विधाटे, श्रीहरी महाराज चौधरी, मुळा प्रवरेचे संचालक सिद्धार्थ मुरकूटे, अशोक कारखाण्याच्या संचालीका सौ. मंजूश्रीताई मुरकूटे, अशोक बँकेचे संचालक बाबासाहेब काळे, गणेशखिंड देवस्थानचे सचीव बजरंग दरंदले, विश्वस्त दत्तात्रय पवार, अशोकचे माजी संचालक बबनराव मुठे आदि प्रमुख उपस्थीत होते.
अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा देवाचे ध्यान श्रेष्ठ आहे म्हणून ध्यानस्थ होवून देवांची सेवा करा. देव देवळात नाही तो देव प्रत्येकाच्या ह्र्दयात आहे पण तो ओळखता आला पाहीजे. संपत्ती आणी दया शक्यतो एकत्र येतच नाही अन् आली तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही. ज्या घरात पापाचा पैसा येत असतो तेथे पुढची एक तरी औलाद नालायक निघाल्याशिवाय राहत नाही. अश्वीन शुद्ध एक हा घटस्थापनेचा दिवस असला तरी तो दिवस संत मुक्ताबाईंचा जन्म दिवस हि आहे. सगळ्या देवी या आदिशक्ती आहेत अन् त्यांचे रूप म्हणजेच संत मुक्ताबाई ह्या आहेत. देव दिसत नाही पण ताकद दिल्याशिवाय राहत नाही, भक्त जेव्हा अडचणीत असतो तेव्हा कुठल्यातरी रूपाने तो हजर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच स्त्रीला नऊ दिवसांचा उपवास असला तरी तिच्या शक्तीमुळे त्या सहज सहन करून जातात.
सध्या शाळांचं पेव फुटलयं, शाळा जास्त अन् पोरं कमी अशी अवस्था झाली आहे. शिवाय शाळांची क्वांटीटी वाढली पण क्वॉलीटी राहीली नाही. सध्या फेसबुक व व्हॉट्सअप सारख्या माध्यमांचा व गेमचा वापर वाढलाय त्याचा विपर्यास होवू लागला आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ फळ्यावर लीहून दिला पाहीजे त्यासाठी जास्त वेळ लागत नाही मग तरी ही व्हॉट्स अप वर गृहपाठ पाठविण्याचे कारण काय? त्यासाठी शाळेत गेल्यानंतर शालेय वेळेत विद्यार्थी अन् शिक्षक दोघांचेही मोबाईल बंद केले पाहीजे त्या शिवाय यात सुधारणा होणार नाही.
ज्ञानेश्वरी ग्रंथ हा संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी लीहीलेला आहे तो अतिशय सालस, कोवळा पण विश्वातला श्रेष्ठ ग्रंथ आहे त्याची दररोज पुजा झाली पाहीजे. आपल्या भागातले थोर संतरूप असलेले श्रीक्षेत्र सराला येथील महंत वै.नारायणगीरीजी महाराज व देवगडचे गुरूवर्य महंत भास्करगीरीजी महाराज हे देवाने पाठविलेले भगवंताचे खरे दास आहेत. कुठलाही मोह नाही, गर्व नाही, पैशाची किंवा गादीची अपेक्षा नाही, सतत हसतमुख साधु, संतांचे सर्वगुण संपन्न असे आजचे साधु म्हणजेच भास्करगीरीजी महाराज हे आहेत. त्यांना सदैव किसनगीरी बाबांचे आशिर्वाद आहे. श्रीक्षेत्र देवगडच्या वैभवाचे उत्तराधिकारी म्हणून नेमणुक झालेले महाराज स्वामी प्रकाशानंदगीरीजी महाराज हे सुद्धा विद्वान आहेत असे गौरवोद्गार या वेळी निवृत्ती महाराज देशमुख यांनी काढले.
यावेळी उत्सव कमेटीचे प्रमुख गणेश छल्लारे, ठकसेन खंडागळे, गंगाराम गायकवाड, महेश पटारे, भाऊराव सुडके, सतीष शेळके, रामदास शिंदे, जालींधर पटारे, पंढरीनाथ मते, भारत छल्लारे, भास्कर आहेर, मच्छींद्र काळे, माजी सरपंच पुनमताई पटारे, स्वामी समर्थ सेवा केंद्राचे गयाबाई शेळके, लीलाबाई जाजू, कल्पना आसावा, शिल्पा न्हावले आदिंसह मोठा जनसमुदाय या वेळी उपस्थीत होता.
किर्तन सांगतेनंतर आण्णासाहेब चौधरी, रामदास शिंदे, भाऊसाहेब बेरड, सागर शिंदे, रफीक शेख व पत्रकार चंद्रकांत झुरंगे आदिंच्यावतीने उपस्थीतांना खिचडी फराळाचे अन्नदान करण्यात आले.
सहयोगी:
पत्रकार अमन सय्यद - बेलापूर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111