अशोकनगर (प्रतिनिधी) : अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखालील अशोक पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या क्रिकेट संघाने श्रीगोंदा येथील परिक्रमा शिक्षण संकुलात खेळल्या गेलेल्या विभागीय अंतिम सामन्यांत अहमदनगर शासकिय पॉलिटेक्निक महाविद्यालयाचा पराभव करुन विजेतेपद पटकाविले. आता अशोक पॉलिटेक्निकचा संघ पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नगर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या विभागीय अंतिम सामन्यात अहमदनगर शासकिय पोलिटेक्निक संघाने आठ षटकात ५६ धावांचे आव्हान ठेवले. अशोक पॉलिटेक्निक संघाने शेवटच्या षटकापर्यन्त झुंज देत हे आव्हान पार करीत विजय मिळविला. कर्णधार आभिजित बनकर, विशाल खेडकर, विजय वंजारे यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. तर रितेश गायकवाड, ऋषिकेश ढाकणे यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. विशाल खेडकर सामन्याचा मानकरी ठरला. प्रा.सचिन कोळसे यांनी व्यवस्यापक म्हणून भुमिका बजावली. संघास प्रताप राऊत, निलेश शेरकर, सतिश उंडे, अनिल चितळकर, रामेश्वर पवार, शिवाजी पटारे, गौरव शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
सदरच्या यशाबद्दल 'अशोक' चे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे, व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, उपाध्यक्ष योगेश विटनोर, सचिव सोपानराव राऊत, युवक नेते सिध्दार्थ मुरकुटे, कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, सहसचिव भास्कर खंडागळे, प्राचार्य अंजाबापू शिंदे आदींनी संघाच्या खेळाडू व मार्गदर्शकाचे अभिनंदन केले आहे.