बेलापूर प्रतिनिधी:
शिव प्रहार प्रतिष्ठनचे अध्यक्ष माजी पोलीस अधिकारी सुरजभाई आगे यांनी लिहीलेले "शिव हिंदुत्व आदेश शिवछत्रपतीचा" या पुस्तकाचे विक्रीचा शुभारंभ नुकताच बेलापूर ग्रामपंचायत आवारात जि.प.सदस्य शरद नवले,सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे,देविदास देसाई यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या पुस्तक विक्रीचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला.
यावेळी अनेकांनी हे पुस्तक वीस रुपये देऊन खरेदी केले, यावेळी जि. प. सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे,पत्रकार देविदास देसाई, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,प्रफुल्ल डावरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्डा यांच्यासह अनेकांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी पत्रकार अनिल पांडे, दिलीप दायमा, सुधीर तेलोरे, राहुल माळवदे, बाबुराव पवार यांच्यासह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.