पोलिस खाते आणि पोलिस खात्यातील बहुतांश अधिकारी, कर्मचारी नेहमीच कौतुकापेक्षा टीकेचे धनी ठरतात यामागे असेच होत आले आहे. यात त्यांचा संवेदनशील,कार्यतत्पर आणि समाजाभिमुख चेहरा अभावानेच समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर नित्याच्या कर्तव्यापलीकडे जाऊन बांधिलकी जपणा-या पोलिस अधिका-याच्या कर्तृत्वाचा वेध घेणारा हा छोटासा आलेख....
समीर बेग राहाता
राहाता पोलिस स्टेशनला साधारण दीड वर्षांपूर्वी एक असाही पोलीस निरीक्षक लाभला ज्याने आपल्या कर्तव्याने व चोख कामगिरीने राहाता शहरासह परिसरातील गुन्हेगारीच्या मुसक्या आवळत परिसरातील गुन्हेगारी जवळ - जवळ संपुष्टात आणली. शहरातील अनेक संवेदनशील प्रकरणात आपले चोख कर्तव्य बजावत शहरातील कायदा सुव्यवस्था आबादीत ठेवली. एक कार्यक्षम पोलिस अधिकारी सोबत वकीलीचे शिक्षणही त्यांनी प्राप्त केल्याने ज्यांच्या या वकिली शिक्षणाचा शासनास देखील मोठा फायदा झाला आहे,असे राहाता पोलिस स्टेशनला लाभलेले कर्तवदक्ष पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या कार्यपद्धतीतून दिसून येते, पो.निरीक्षक श्री.गायकवाड हे आपले कर्तव्य पार पाडत असतांना पोलिस स्टेशनला आलेल्या त्रयस्त नागरिकांना सहकार्य करत त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांची दखल घेत आपल्या सहकर्मियांना आलेल्या नागरिकांची दाखल घेण्यास सांगून पोलिस स्टेशनला आलेल्या नागरिकांच्या शांतचित्तेने समस्या ऐकून घेत त्यांना योग्य मार्ग,योग्य न्याय देण्याचा प्रयत्न हे सातत्याने करत असतात. शहरासह परिसरातील नागरिकांमध्ये आज एक कर्तव्यदक्ष पोलीस अधीकारी म्हणून सुनील गायकवाड यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे ती त्यांच्या कार्यगुणांनेच हे सत्य याठिकाणी नमुद करावेसे वाटते, पुढील येणाऱ्या काही दिवसांतच श्री. सुनील गायकवाड यांचा कार्यकाळ संपणार असून ते सेवानिवृत्त होणार आहेत.परंतु त्यांनी आपल्या शासकीय सेवा कार्यकाळात आपल्या सुकर्तृत्वाचा जो एक आगळा- वेगळा ठसा जनसामान्यांत निर्माण केला आहे,हे राहाता कार्यक्षेत्राती जनसामान्य नागरीक कधीच विसरु शकणार नाही हे म्हणून परिसरातील जनसामान्य मोठ्या आदराने म्हणतात, आले,गेले,तसे अनेक येतील आणि जातील ! पो.नि.गायकवाड सर्वांच्या लक्षात राहतील !!
हीच अशा या कार्यक्षम पोलिस अधिकाऱ्याची खरी कमाई होय.