श्रीरामपूर (प्रतिनिधी) : भारताच्या माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधीनी देशाला संरक्षण दृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर बनविले. याचबरोबर देशाला अण्वस्ञसज्ज देशांच्या पंक्तीत नेवून ठेवले. तर झाशीची राणी लक्ष्मीबाई या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील एक अग्रणी सेनानी होत्या. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यात आलेल्या इ. स. १८५७ च्या युद्धाचा इतिहास राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या रक्ताने लिहिला असून त्या आपल्या सर्वांसाठी एक आदर्श असल्याचे प्रतिपादन अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले. लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने श्रीरामपूर येथे इंदिरा गांधी आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त श्री.मुरकुटे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी संपर्क प्रमुख रोहन डावखर यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे विषयी तर विशाल धनवटे यांनी इंदिरा गांधी यांचेविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब मुळे, मार्केट कमिटीचे माजी संचालक रमेश सोनवणे, शेतकरी सेवा केंद्राचे अमोल कोलते, कारेगाव भाग कंपनीचे संचालक संजय लबडे, सचिव प्रमोद करंडे, रामचंद्र कोकाटे, बाळासाहेब गोराणे, विराज आंबेकर, संकेत संचेती, नितीन क्षीरसागर, संदीप डावखर, नवाब सय्यद, ज्ञानदेव वर्पे, कैलास भागवत, लालाशेठ देवी, जयेश परमार, संजय मोरगे, दिलीप शिंदे, पंकज देवकर आदी उपस्थित होते.तसेच अशोक कारखाना कार्यस्थळावरही झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री.भाऊसाहेब उंडे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी कार्यकारी संचालक संतोष देवकर, मॅनेजर ॲग्री नारायण चौधरी, कार्यालय अधिक्षक विक्रांत भागवत, ऊस विकास अधिकारी विजय धुमाळ, लेबर ऑफिसर अण्णासाहेब वाकडे, कारेगाव भाग कंपनीचे मॅनेजर ज्ञानेश्वर बडाख, विलास लबडे, बाळासाहेब मेकडे, कैलास नाईक, चंद्रकांत दांगट आदी उपस्थित होते.