नळाद्वारे दुषित पाणी पुरवठा होण्याचे कारण काय ?नागरीकांचा सवाल ग्रामपंचायत प्रशासनाकडून तातडीने टाक्या स्वच्छ करण्याचे आदेश - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

19 November 2022

नळाद्वारे दुषित पाणी पुरवठा होण्याचे कारण काय ?नागरीकांचा सवाल ग्रामपंचायत प्रशासनाकडून तातडीने टाक्या स्वच्छ करण्याचे आदेश




 देवीदास देसाई बेलापूर:

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जल वाहीनीतुन गेल्या दोन महीन्यापासुन दुषित पाणी पुरवठा केला जात असुन नळाद्वारे दुषित पाणी येण्यामागील नेमके कारण काय आहे? असा सवाल माजी सरपंच भरत साळूंके व रविंद्र खटोड यांनी केला आहे.                गेल्या काही दिवसांपासुन बेलापुर व परिसराला दुषित पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरीकांच्या तक्रारी होत्या तसेच याबाबत रविंद्र खटोड,भरत साळुंके, सुधीर नवले, चंद्रकांत नाईक यांनी ग्रामपंचायतीकडे तोंडी तक्रार केली होती.या सर्व तक्रारींची दखल घेत बेलापुर ग्रामपंचायतीच्यावतीने पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी संदर्भात ग्रामस्थांची बैठक बोलविण्यात आली होती.त्या वेळी पाण्यात टी सी एल तुरटी टाकण्यात अडचण येते काय ? नळाला क्षारयूक्त पाणी का येते ? असा सवाल चंद्रकांत नाईक यांनी केला तर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले यांनी मुख्य पाणी पुरवठा करणाऱ्या जल वाहीनीला लिकेज असल्यामुळे दुषित पाणी येत असुन दोन वर्षापूर्वी खरेदी केलेल्या चांगल्या प्रतीच्या तुरटीचा वापर का केला गेला नाही ? तसेच फिल्टर दुरुस्ती केव्हा होणार ? काम पुर्ण झाले नाही तर ठेकेदाराला बिल अदा कसे केले ? असा सवाल नवले यांनी केला. बेलापुर गाव व परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकुण बारा टाक्या असुन या टाक्यांची बऱ्याच दिवसांपासुन स्वच्छता केली नसल्याची बाब या निमित्ताने समोर आली असुन टाक्या सफाईचे काम सुरु करण्यात आलेले असून तातडीने सर्व पाणी टाक्या साफ केल्या जातील असे अश्वासन उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिले.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने वेळोवेळी पाणी तपासणी केली गेली पाहीजे परंतु तसे होत नाही, दुषीत पाण्यामुळे आजार वाढत असल्याच्याही तक्रारीचा सूर या वेळी आळविण्यात आला. यावेळी बोलताना सरपंच महेंद्र साळवी म्हणाले की गावाला चांगला पाणी पुरवठा कसा होईल याची दक्षता घेतली जाईल, स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायत कटीबद्ध आहे.कालव्यामधून तळ्यात आलेले पाणी देखील दूषित आहे त्याबाबत जलसंपदा खात्याकडे लेखी तक्रार केली आहे.पाणी पुरवठ्याबाबत काही सुचना असेलतर त्याचीही दखल घेतली जाईल असेही ते म्हणाले. उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की, गावात दूषित पाणी पुरवठा व्हावा अशी कुठल्याच पदाधिकारी अथवा सदस्याची इच्छा नसते.स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक सर्व उपाय योजना त्वरित करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. पाणी पिण्यास योग्य की अयोग्य हे तपासणी करुन अहवाल देण्याची जबाबदारी आरोग्य विभाग व जलरक्षक यांची असताना पाणी पिण्यास योग्य कि अयोग्य असा कोणताच अहवाल ग्रामपंचायत कार्यालयाकडे आला नसल्याचे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले, त्यावेळी ओ टी घेण्याची जबाबदारी कुणाची असा सवाल साळूंके यांनी विचारताच ओ टी काय असते असा प्रतिप्रश्न सरपंच साळवी यांनी केला.यावेळी पिण्याच्या पाण्याचे रोटेशन मिळावे अशी मागणीही करण्यात आली.ग्रामपंचायतीने स्वतः हुन पाणीपुरवठ्याबाबत बैठक बोलावली याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

या वेळी सदस्य मुस्ताक शेख, शफीक बागवान, पुरुषोत्तम भराटे, मोहसीन सय्यद, राम पोळ, प्रसाद खरात, गोपी दाणी, इस्माईल शेख, समीर शेख, गफुर शेख, अजीज शेख, सचिन अमोलीक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. महेंद्र मेश्राम, प्रशांत गायकवाड, तान्हाजी गडाख, संतोष शेलार,पत्रकार देविदास देसाई ,दिलीप दायम, किशोर कदम, अजीज शेख, रमेश अमोलीक,रमेश कुमावत, बाबुलाल पठाण, गोविंद खरमाळे, सतीश मोरे, बागवान आदि उपस्थित होते.

LightBlog

Pages