लोकसेवा विकास आघाडीच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर ग्रामीण भागातील रस्त्यांची डागडुजी सुरु झाल्याने मोर्चा स्थगित; धुमाळ - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

18 November 2022

लोकसेवा विकास आघाडीच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर ग्रामीण भागातील रस्त्यांची डागडुजी सुरु झाल्याने मोर्चा स्थगित; धुमाळ




 श्रीरामपूर (प्रतिनिधी) :

श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील मुख्य तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. या रस्त्यांची डागडुजी व दुरुस्ती तात्काळ सुरु करावी,अन्यथा माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा लोकसेवा विकास आघाडीने दिल्यानंतर मतदार संघातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे प्रत्यक्षात सुरु झाली असल्याने याप्रश्नी सोमवारी (ता.२१) माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मोर्चा स्थगित केल्याची माहिती लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ यांनी दिली. 

     श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील श्रीरामपूर तालुक्यासह मतदार संघात समाविष्ट राहुरी तालुक्यातील ३२ गावे तसेच ग्रामीण भागातील संपर्क रस्त्यांच्या दूरावस्थेबाबत तसेच दुरुस्तीची कामे तात्काळ सुरु करावीत, या मागणीसाठी लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने मागणी करण्यात आली होती. तसेच कामे सुरु न झाल्यास माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली जनांंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. याची तत्परतेने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पंचायत समिती प्रशासनाने रस्ते दुरुस्तीची कामे सुरु केली आहेत.रस्त्यांच्या डागडुजी, खड्डे बुजविणे आदी कामे प्रत्यक्षात सुरु केली असल्याने याप्रश्नी सोमवारी (ता.२१) आयोजित मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. याबाबत मतदार संघातील जनतेने समाधान व्यक्त करीत माजी आ.भानुदास मुरकुटे व लोकसेवा विकास आघाडीला धन्यवाद दिले आहेत.लोकसेवा विकास आघाडीच्या मागण्यांची तत्परतेने दखल घेऊन त्वरित कार्यवाही केल्याबद्दल उपविभागीय अधिकारी अनिल पवार,तहसीलदार प्रशांत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागास लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने श्री.धुमाळ यांनी धन्यवाद दिले आहेत.

LightBlog

Pages