विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून ग्रामसेवक श्री.रुबाब पटेल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
श्रीरामपूर (प्रतिनिधी) :
श्रीरामपूर तालुका पंचायत समितीतील आदर्श ग्रामसेवक व श्रीरामपूर तालुका जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे तालुकाध्यक्ष श्री.रुबाब पटेल यांची नुकत्याच २०२२-२०२७ या पंचवार्षिक कालावधीसाठी झालेल्या अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकी साठी राबवीलेल्या प्रक्रियेत श्रीरामपूर तालुका सर्व साधारण मतदार संघातुन बिनविरोध निवड करण्यात आली.
सदरची निवडणुक ग्रामसेवकांचे नेते मा.राज्याध्यक्ष व विद्यमान अहमदनगर जिल्हाध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांचे नेतृत्वाख़ाली पार पडली.ही संपूर्ण निवडणूक बिनविरोध करण्यात आली असून प्रत्येक तालूक्यातून एका ग्रामसेवकाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडणूकीमध्ये संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील संस्थेच्या सर्व सभासद ग्रामसेवक बंधू- भागिनींनी यशस्वीपणे सहभाग नोंदविला असून नवनिर्वाचित सर्व संचालक मंडळाचे सभासद बंधू - भागिनींच्यावतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत येवून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.
श्रीरामपूर तालुक्यातून ग्रामसेवक श्री.रुबाब पटेल यांच्या निवडीचे ग्रामसेवक संघटनेचे माजी राज्याध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हाध्यक्ष एकनाथ राव ढाकणे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष रमेश निबे पाटील,कार्याध्यक्ष संदीप बडाख पाटील,अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे संपर्क प्रमुख तुकाराम जाधव,संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते समीर मनियार,विजय धाकतोडे, दिपक मेहरे,माधवी पडघलमल,शीतल पन्धारे व इतर सर्व ग्रामसेवक बंधु- भागिनींनी अभिनंदन केले आहे,
श्री.पटेल यांचा सुस्वभाव आणि परोपकारी व्यक्तिमत्त्व सोबतच सर्वांना सोबत घेवून चालण्याची तथा आपली शासकीय सेवा बजावत असताना ग्रामीण भागातील अनेकांच्या अटीतटीच्या कटू प्रसंगात योग्य मार्ग दाखवित त्यांना योग्य सल्ला देत अनेकांना निर्पेक्षतेने आपलेसे करण्याची कार्यपध्दती ही सर्वांपेक्षा जरा वेगळी असल्याने त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, पत्रकारीता अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांमध्ये मोठा मित्र परिवार जोडला गेला असल्याने अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून देखील त्यांच्यावर अभिनंदनासोबत शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.