आरोग्य आणि संस्कृतीचे संवर्धन,संरक्षण करणे ही काळाची गरज आहे =डॉ. महेश क्षीरसागर - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

11 November 2022

आरोग्य आणि संस्कृतीचे संवर्धन,संरक्षण करणे ही काळाची गरज आहे =डॉ. महेश क्षीरसागर





 शौकतभाई शेख श्रीरामपूर

आधुनिक युगात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची आणि संस्कृती विचाराची काळजी घेतली पाहिजे, त्यासाठी आपणच जागृत राहून या जीवनपोषक घटकांचे  संवर्धन, संरक्षण ही काळाची गरज असल्याचे मत शिव आरोग्य सेनेचे उत्तर महाराष्ट्र  नूतन अध्यक्ष डॉ. महेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

येथील शिवाजीनगर भागातील त्रिमूर्ती आयुर्वेदिक संशोधन आणि विकास संस्था कार्यालयात डॉ.महेश क्षीरसागर यांचा शिव आरोग्य सेनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाल्याप्रीत्यर्थ   शेळके मित्रपरिवारातर्फे सन्मानसोहळा  आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी डॉ. महेश क्षीरसागर बोलत होते, अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी. ई. शेळके  होते.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करून उपस्थितांचा परिचय करून दिला.यावेळी माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे,महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष, पत्रकार प्रकाश कुलथे,विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे,ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्याचे सदस्य प्रा. शिवाजीराव बारगळ, बाळासाहेब बनकर,विलासराव जोशी,रामनाथ सावंत, तानाजी राऊत,डॉ.सौ.मंजिरी क्षीरसागर आदींसह आयुर्वेदिक संशोधन आणि विकास संस्थेतील सदस्य उपस्थित होते.

डॉ. महेश क्षीरसागर यांनी आपली झालेली निवड ही प्रामाणिक सेवेची संधी आहे.आपण समाजसेवेला प्राधान्य देतो. आजच्या स्थितीत आरोग्य टिकवणे गरजेचे आहे.आरोग्य सेवेचा विचार,कार्य हे पक्ष, धर्म, जात,विभाग न बघता विविध उपक्रम घेतले जातात.कोरोना काळात ही सेवा करताना आम्ही समर्पित झालो होतो, कारण ती काळाची गरज होती.अशा सन्मानातून मला कार्य करण्याची अधिक ऊर्जा आणि प्रेरणादायी दिशा मिळेल, समाजाने दखल घेणे ही सर्वात समाधानाची वाटचाल असते.सर्वांनी माझ्याबद्दल मनोगतातून विविध जाणिवात्मक भावना व्यक्त केल्या ही माझी प्रेरणाभूमी आहे, असे मत व्यक्त केले.प्राचार्य शेळके यांनी शाल,पुस्तके तसेच डॉ. बाबुराव उपाध्ये, सुखदेव सुकळे, प्राचार्य डॉ. गागरे यांनी विविध पुस्तके भेट दिलीत.पत्रकार प्रकाश कुलथे यांनी 'वर्ल्ड सामना' दिवाळी अंक देऊन सत्कार केला. विलासराव जोशी, तानाजी राऊत, रामनाथ सावंत, बाळासाहेब बनकर यांनी डॉ. महेश क्षीरसागर आणि डॉ. सौ.मंजिरी क्षीरसागर यांचा सत्कार केला.डॉ.सौ. मंजिरी क्षीरसागर यांनी समारोप भाषणातून आपण नेहमीच डॉ. महेशजी क्षीरसागर यांच्या सेवाभावी कार्यात सहभागी होऊन त्यांच्या समाजसेवेला सहकार्य करतो असे सांगून हा प्रेरणादायी कार्यक्रम असल्याचे सांगितले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

LightBlog

Pages