डॉ.अल्लामा इक्बाल यांनी सतत प्रोत्साहनात्मक शायरी केली- डॉ. कमर सुरुर - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

11 November 2022

डॉ.अल्लामा इक्बाल यांनी सतत प्रोत्साहनात्मक शायरी केली- डॉ. कमर सुरुर



 


ए.टी.यु.जदीद उर्दु शाळेत जागतिक उर्दू दिन साजरा 


अबीद शेख अहमदनगर:

उर्दू साहित्यिकांनी नियमित वेगवेगळे विषय घेऊन आपली शायरी केलेली आहे व त्या विषयाचे गांभीर्य लोकांसमोर मांडले आहे. पण डॉ.अल्लामा इक्बाल यांनी आपल्या प्रत्येक रचनांमधून समाजाच्या व विशेष करून युवकांसाठी प्रोत्साहनात्मक शायरी सादर करून जनजागृती केली आहे. असे प्रतिपादन मखदुम सोसायटीच्या सचिव डॉ कमर सुरुर यांनी केले.

ए.टी.यु.जदीद उर्दु प्रायमरी व मखदूम सोसायटीच्या वतीने जागतिक उर्दू कवि व साहित्यकार डॉ.अल्लामा इक़बाल यांच्या जयंतीनिमित्त जागतिक उर्दू दिन साजरा करण्यात आला. त्या वेळी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ.कमर सुरुर बोलत होत्या. याप्रसंगी मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान,मुख्याध्यापक नासीर खान,रतलाम येथील उर्दू कवि अय्युब आसिम,नसरीन शेख, आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ.कमर म्हणाल्या की डाॅ.ईकबाल यांनी कधीही छंद किंवा लोकांच्या मनोरंजनासाठी शायरी ना करता समाजामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या चुकीच्या बाबींना आपल्या रचनांतून टीका केली व समाजाला जागृत केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना नासीर सर यांनी शाळेत आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सुत्रसंचालन इमरान खान यांनी केले. तर आभार शेख जुनैद यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी सैय्यद फरहाना,अन्सार शेख, इरफान खान, दानिश शेख, सैफ़ शेख,तस्लीम ख़ान, पटेल झिशान आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विधार्थी उपस्थित होते.

LightBlog

Pages