अतिवृष्टीने खरीप वाया गेला मात्र शासनाच्या मदतीमुळे रब्बीची पिके उभारण्याकरिता शासनाकडून मदत होईल अशी अपेक्षा होती मात्र प्रशासनाकडून दोन महिन्यापासून पंचनाम्याचे केवळ फार्स करून कागदी घोडे नाचण्यापलिकडे काहीच होताना दिसून येत नसल्याने शासनाला जाग आनण्यासाठी बिऱ्हाड मोर्चाचे आयोजन केले गेले - प्रभाताई घोगरे
राहाता समीर बेग
येथील तहसील कार्यालयावर दिनांक ११ नोव्हेंबर रोजी कृषिभूषण प्रभावती घोगरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांबाबत शेतकऱ्यांना सोबत घेऊन पशुधनासह बिऱ्हाड मोर्चा आणण्यात आला. या वेळी सदरील निवेदनाची व मोर्चाची दखल घेत तहसीलदार कुंदन हिरे यांनी त्वरित शासनाकडे मागण्या पाठविणार असल्याचे पत्र देऊन मोर्चा स्थगित करण्याची विनंती केली."निवेदनातील प्रमुख मागण्या १) राहाता तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत देण्यात यावी.. २) राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत खरीपासाठी विमा हप्ता भरलेला असताना काही शेतकऱ्यांना अत्यल्प परतावा मिळाला तर काहीना अद्यापही मिळालाच नाही त्या सर्व शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात पिक विमा परतावा मिळावा.३) अतिवृष्टीमुळे राहाता तालुक्यातील बहुतांश गावाचे शिवार वाहनीचे रस्ते वाहून गेलेले आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी वहिवाट करण्याकरिता शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. तरी ते तातडीने दुरुस्त करण्यात यावे वरील सर्व मागण्या आपल्या स्तरावर व कार्यालयाशी निगडीत असल्याने याची पूर्तता करणे ही आपली जबाबदारी आहे. तरी वरील सर्व मागण्या मान्य करून माझ्या बळीराजाला न्याय द्यावा.अशी मागणी प्रभाताई घोगरे यांनी आपल्या निवेदनात शेतकऱ्याची व्यथा मांडली.तर तहसीलदार कुंदन हिरे यांनी पत्राद्वारे आश्वासित करत आंदोलन स्थगित करण्यास विनंती केली १) राहाता तालुक्यात माहे जून २०२२ ते आक्टोबर २०२२ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्यात आलेले आहेत. तसेच याबाबत मा. जिल्हाधिकारी अहमदनगर यांना तालुक्यातील नुकसानी बाबतचा अहवाल सादर करणेत आलेला आहे. शासनाकडून अनुदान प्राप्त झालेंनंतर मदत वितरण करणेत येईल.२) पीक विमा बाबत तालुकस्तरीय पीक विमा तक्रार निवारण समितीची बैठक शेतकरी प्रतिनिधी यांचे समवेत दिनांक १/११/२०२२ रोजी घेण्यात आली व त्या बैठकीमध्ये पीक विमा कंपनी यांना पीक विमा बाबत शेतकरी यांचेकडून प्राप्त झालेल्या तक्रारी बाबत फेर सर्वेक्षण करणे व शेतकरी यांचे खातेवर जमा झालेली रक्कम सर्वेक्षणानुसार आहे काय ? याबाबत अहवाल पाठविणेस निर्देश दिलेले आहेत. तसेच यामध्ये तफावत आढळल्यास उर्वरित रक्कम शेतकरी यांच्या खात्यावर वर्ग करणेबाबत पीक विमा कंपनीला निर्देश दिलेले आहेत. तसेच शिवार रस्ते बाबत मागणी आल्याप्रमाणे सर्व संबधित यंत्रणा यांना दुरुस्ती बाबत कळविण्यात आले आहे. सबब मोर्चा स्थगित करावा असे तहसिलदार श्री.हिरे यांनी पत्र देत आंदोलन स्थगित करण्यात आले.