शौकतभाई शेख श्रीरामपूर:
मराठी भाषा, संस्कृती,माणूस आणि समाज यांना दिवाळी अंकाच्या वाचनातून आनंद, मनोरंजन आणि जीवनसंस्कार मिळतात, श्रीरामपूरसारख्या आधुनिक शहरात गेल्या ३० वर्षांपासून पत्रकार,संपादक प्रकाश कुलथे यांचा 'वर्ल्ड सामना 'दिवाळी अंक वाचकांना जसा खळखळून हसवतो तसा अंतर्मुख करतो असे मत ॲड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांनी व्यक्त केले.
येथील शिवाजीनगर भागात शेळके सभागृहात'वर्ल्ड सामना 'या विनोदी दिवाळी अंकावर चर्चा आणि परिसंवाद उपक्रमात प्राचार्य शेळके बोलत होते.प्रारंभी मुख्य संपादक पत्रकार प्रकाश कुलथे यांनी स्वागत, प्रास्ताविक मनोगतातून अंकाची माहिती दिली. महाराष्ट्र राज्याचे कार्यकुशल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते मुंबईमधील त्यांच्या वर्षा या निवासस्थानी नुकतेच या अंकाचे प्रकाशन झाले, मुख्यमंत्री यांनी अंकाचे भरभरून कौतुक केले, त्यांनी आपल्यावरच असलेल्या मुखपृष्ठविषयी चर्चा केली. या दिवाळी अंकात महाराष्ट्रातील मान्यवर साहित्यिक आणि विचारवंत यांचे लेखन आहे,ते वाचकांना भावणारे असल्याचे सांगितले. प्राचार्य शेळके यांनी श्रीरामपूरला भूषणावह असणारा हा दिवाळी अंक सतत संग्रही ठेवून वाचनीय असल्याचे सांगितले. यावेळी संपादक पत्रकार प्रकाश कुलथे यांनी प्रचार्य शेळके यांचा तर निवासी संपादक डॉ. बाबुराव उपाध्ये साहित्यिक सुखदेव सुकळे यांना दिवाळी अंक देऊन सन्मान केला. यावेळी माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे,प्रा. शिवाजीराव बारगळ, रामनाथ सावंत,तानाजी राऊत, विलासराव जोशी आदी उपस्थित होते.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आभार मानले.