राजेंद्र बनकर - शिर्डी
साईबाबांच्या दान पेटीत दीपावली उत्सवा निमित्त १७ कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांचे दान भाविकांनी साईचरणी अर्पण केले आहे.
शिर्डी दीपावली उत्सवानिमित्त बाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो भावी साई चरणी नतमस्तक होण्याकरिता शिर्डीत येतात. २० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर यादरम्यान साईसमाधी दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी साईबाबांच्या दानपेटीत भरभरून दान टाकले. यामध्ये जवळपास १७ कोटी ७७ लाख ५३ हजार ३१२ रुपयाचे दान जमा झाले आहे. यामध्ये देणगी काउंटरवर ७ कोटी ५४ लाख ४५ हजार ४०८ रुपये व दक्षिणा पेटीत ३ कोटी ११ लाख ७९ हजार १५४ रुये जमा झाले. ऑनलाइन पद्धतीने १ कोटी ४५ लाख ४२ हजार ८०८ रुपये, चेक, डी. डी. याद्वारे ३ कोटी ३ लाख ५५ हजार ९४६ रुपये, मनिऑर्डरद्वारे ७ लाख २८ हजार ८३३ रुपये, डेबीट, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून १ कोटी ८४ लाख २२ हजार ४२६ रुपये जमा झाले.
२९ देशांतील विदेशी भाविकांनी २४ लाख ८० हजार ७०१ रुपयांचे परकीय चलन आहे. ५ लाख ४५ हजार ९७७ रुपये किंमतीची १३ हजार ३४५.९७० ग्रॅम चांदी आणि ३९ लाख ५३ हजार २९ रुपये किंमतीचे ८६०.४५० ग्रॅम सोने असे जमा झाले आहे.