राजेंद्र बनकर - शिर्डी
शिर्डी (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद उर्दू शाळेतील शिक्षक सय्यद सुभान सर यांचे चिरंजीव डॉ. वसीम यांचे क्लिनिक व सहारा मेडिकलचे शिर्डी येथे मा.खासदार डॉ.सुजयदादा विखे पा. यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी ते म्हणाले कि सय्यद सुब्हान सरांनी आपल्या मुलांना सुशिक्षित बनवून व शिर्डी सारख्या पावन नगरीत गोरगरीबांसाठी क्लिनिक व मेडिकल सारखी आरोग्य सेवा सुरु करुन संपूर्ण समाजासाठी आदर्श निर्माण केला आहे.समाजाने त्यांचा आदर्श घ्यावा तसेच परिसरातील गोरगरीबांनी आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले.यावेळी शिर्डी चे मा. नगरसेवक रविंद्र गोंदकर, नितिन कोते,विजूभाऊ जगताप,ताराचंद कोते,दत्ता कोते,कमलाकर कोते, दिपक गोंदकर, रवि विलास कोते,दिपक वारुळे, नाना वारुळे, हाजी बिलाल, शिर्डी नगरपरिषद चे मुख्याधिकारी डोईफोडे साहेब, हाजी बाबाभाई,हाफिज फहीम, हाजी गनीभाई, हाजी शमशुद्दीन, शफीक भैय्या ,जावीदभाई, महेमुद सय्यद,समीर पठाण व समाजाचे व शिर्डी चे प्रतिष्ठित मान्यवर व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.