नगर पालिका आणि पोलिस प्रशासन लक्ष देणार का ? अकबरभाई शेख
अजिजभाई शेख : राहाता
सध्या आपल्याकडे पतंग उडविण्याच्या नायलॉन मांज्यास बंदी आहे,कारण याद्वारे अनेक अपघात घडून अनेकांना कायमचे अपंगत्व आणि कित्येकांना अवेळी मृत्यूस कवटाळण्याची,तर काहींना गंभीर जखमी होण्याची वेळ येत आहे,बंदी असताना देखील या मांज्याची शहरात खुलेआम विक्री होत असुन नगर पालिका आणि पोलिस प्रशासन अशा मांज्या विक्रेत्यांवर योग्य कारवाई करण्याऐवजी बघ्याची भुमिका घेत असल्याने नागरीकांना मोठा मनस्ताप सहन करणे भाग पडत आहे, याकरीता संबंधित नायलॉन मांजा विक्रेत्यांवर नगर पालिका आणि पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करुन जबरी दंड वसूल करत ही मांजा विक्री त्वरित थांबवावी अशी मागणी संबंधित विभागाकडे भारतीय मानवाधिकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष अकबर शेख यांनी केली आहे,
सविस्तर असे की, आपल्या मुलांना शाळेत सोडविण्यासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या
युवकाच्या गळ्याला चेहऱ्याला व ओठाला पतंग उडवणाऱ्या नायलॉन मांजामुळे मोठी दुखापत होऊन ओठाला ४ टाके पडल्याची घटना मंगळवारी नुकतीच राहाता शहरात घडली.सुदैवाने शाळकरी मुलांना कुठलीही दुखापत,इजा झाली नाही.
पतंग उडवण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजा दोऱ्याला बंदी असतानाही राहाता शहरातील अनेक दुकानदार सर्रासपणे या मांजाची विक्री करताना दिसून येत आहे,मोठ्या प्रमाणात मांजाचा सर्रास वापर होत असल्याने पोलिसांच्या व नगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे अनेकांना या मांजापासून जीव घेण्या प्रकाराला सामोरे जावे लागत आहे. मंगळवारी राहाता शहरातील अनिल बोठे हे सकाळी मुलांना शाळेत सोडण्याकरिता दुचाकीवरुन जात असताना येथील खंडोबा चौक जवळील धान्य गोडाऊन जवळ ही घटना घडल्यानंतर त्यांना तात्काळ डॉ. पानगव्हाणे यांच्या हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.मांजा पतंग उडविण्याच्या नॉयलॉन मांज्या (दोऱ्या) मुळे त्यांच्या गालावर,ओठावर आणि मानेवर मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे, त्यामुळे त्यांच्या ओठाला ४ टाके पडले. सुदैवाने दुचाकीवर बसलेल्या मुलांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.
राहाता शहरात पतंग उडवण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजावर बंदी असतानांही पोलीस व नगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे शहरातील अनेक दुकानांत या मांजा दोऱ्याची सर्रास विक्री होत आहे, त्यामुळे अनेक नागरिकांना तसेच पशु - पक्ष्यांना या दोऱ्यामुळे इजा होत आहे, संबंधित पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने या मांजा दोरा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करुन त्यांच्याकडून जबरी दंड वसूल करत बंदी असलेल्या नॉयलॉन मांज्याची विक्री तात्काळ थांबवावी अशी भारतीय मानवाधिकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष अकबर शेख यांनी एक निवेदन पत्राद्वारे केली आहे.
अकबर शेख:
जिल्हाध्यक्ष भारतीय मानवाधिकार परिषद,